वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ – Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme
योजनेचे नाव | Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme 2022 |
योजनेचा उद्देश | भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे,आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे. |
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/- रुपये करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ म्हणजे ज्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लघु उद्योग करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ज्यामध्ये तुम्ही विविध लघु व्यवसाय करू शकता जसे कि,
- आईस्क्रिम पार्लर व इतर,मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान,
- मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक,
- पॉवर टिलर,
- हार्डवेअर व पेंट शॉप,
- सायबर कॅफे,
- संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी,
- सलुन, ब्युटी पार्लर मसाला उद्योग, पापड उद्योग,
- मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र,
- भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क,
- स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीट्युट,
- ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज,
- फ्रिज दुरुस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप,
- आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग
VJNT loan scheme 2022 कर्जाचे स्वरूप :
- प्रकल्प खर्चाची मर्यादा १ लाख रूपये पर्यंत असेल. या योजनेत महामंडळाचा सहभाग १००% असून कर्जमंजूरीनंतर १ लाख रूपयांचे कर्ज लाभार्थ्याला देण्यात येईल. जे लाभार्थी कर्जाची परतफेड दिलेल्या वेळेत करतील अशा लाभार्थ्यांकडून व्याज आकारण्यात येणार नाही.
- नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.
- कर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला कर्जदाराला पहिला हप्ता ७५% असेल म्हणजे तुम्हाला ७५ हजार पहिल्यांदा भेटतील.
- आणि उरलेली बाकी २५ हजार रुपये तुमचा उद्योग सुरु झाल्यानंतर ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतील.
वसंतराव नाईक कर्ज योजना 2022 पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
- उमेदवार कोणत्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
- उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला या लाभार्थीना तात्काळ व प्राथम्याने लाभ देण्यात येणार आहे.
vasantrao naik mahamandal online application documents – कागदपत्र
- आधार कार्ड
- पैन कार्ड
- बैंक पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- एक पासपोर्ट साइज फोटो
ऑफलाईन अर्ज कोठे करायचा ?
- ऑफलाईन अर्ज विक्री महामंडळाचे जिल्हा कार्यालय, येथे सुरु आहे.
- अर्ज घेण्यासाठी सोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड घेऊन जाणे गरजेचे आहे.
वसंतराव नाईक कर्ज योजनेचा GR
vasantrao naik mahamandal online application : असा करा ऑनलाईन अर्ज
सर्व प्रथम तुमाला येथे दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर आल्यानंतर नोंदणी या ऑपशन वर क्लिक करा. क्लिक केल्या नंतर नोंदणी फॉर्म उघडेल.
स्टेप १ : वयक्तिक माहिती
- पासपोर्ट साईझ आकाराचा लाभार्थ्यांचा फोटो अपलोड करा.
- लाभार्थी प्रकार
- अर्जदाराचे संपूर्ण नाव
- अर्जदाराचे वडील किंवा पतीचे नाव
- आईचे नाव
- जन्म तारीख
- वय
- मोबाईल नंबर
- ही सर्व माहिती भरल्या नंतर submit करा या ऑपशन वर क्लिक करा. खाली फोटो दिला आहे.
स्टेप २ : पत्त्याचा तपशील
- यामध्ये तुम्हाला तुमचा करंट ऍड्रेस आणि पर्मनंट ऍड्रेस भरायचा आहे.
- जिल्हा
- तालुका
- पिनकोड
- अशी सर्व माहिती भरावी लागेल.
स्टेप ३ : Income /Business /bank details
- इनकम डिटेल्स मध्ये तुम्हला वार्षिक उत्पन्न किती आहे आहे ते टाकायचे आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या मध्ये असायला पाहिजे.
- अगोदर तुमचा busines असेल तर yes करा नसेल तर no हे ऑपशन निवडा.
- नंतर business चे नाव टाका.
- अगोदर पासून business असेल तर त्याचा address टाका.
- पुढे तुम्ही तुमच्या अगोदर च्या business साठी बँकेकडून Loan घेतले असेल तर Yes हे ऑपशन निवडा . नसेल तर no निवडा.
- खाली business Details मध्ये जी माहिती विचारली आहे ती भरा.
bank details –
- यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर
- खातेदाराचे नाव
- बँकेचे नाव
- बँक ब्रँच
- IFSC code
- पुढे तुम्हाला किती loan ammount पाहिजे ते टाका १ लाख रुपये पर्यंत रक्कम टाकू शकता.
- पुढे business चे नाव टाकायचे आहे.
- पुढे तुम्हाला कोणत्या बँक मधून loan हवे आहे ते सिलेक्ट करा.
- ही सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करा.
स्टेप ४ : docmument
- यामध्ये तुम्हाला दिलेल्या सर्व ऑपशन ला टिक करा.
- ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड अपलोड करा.
- कास्ट सर्टिफिकेट
- रेशन कार्ड
- income certificate
- business कोटेशन
- हे document अपलोड करून submit बटण वर क्लिक करा.
पूढे तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता.अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ योजनेची अधिक माहिती साठी तुमच्या जिल्ह्या च्या हेल्पलाईन नंबर खाली दिला आहे त्यावर संपर्क करा.
👉👉येथे पहा तुमच्या जिल्ह्याचा हेल्पलाईन नंबर
दुसऱ्या योजना
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज मर्यादा वाढ । LASDC Loan schemes 2022
- उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२
- प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
- ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी 2021-22 । Tractor yadi
- हिंगोली जिल्ह्यासाठी ट्यूब वेल व पंपसेट अनुदान २०२२ अर्ज सुरु
-
उत्पन्नाचा दाखला अर्ज फ्री डाउनलोड करा, कागदपत्रे, सर्व माहिती
- pm daksh yojana registration | pm daksh yojana 2022
- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना 2021-22 असा करा ऑनलाईन अर्ज
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021-22 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 | ऑनलाईन अर्ज असा करा
- Pocra yojna 2022 | पोकरा योजना लाभार्थी यादी 2021-22
- विहीर अनुदान योजना 2021 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021-22 Online form | असा करा ऑनलाईन अर्ज
कुक्कुटपालन साठी आहे का
या योजने साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच लिंक देन्यात यवि 15 फेबुरवारी पासुन ही योजना सुरु झाली असेल आनी अता पर्यंत पूर्ण माहिती नाही आली अश्यात सर्व सामान्य जनतेस यांचा लाभ वेळेवर घेता येणार नाही 🙏🏻
Apply karaychi link kuthe ah
Kirana dukan
ऑनलाइन फॉर्मची पीडीएफ वेबसाईट वर पाठवा जिल्हा व्यवस्थापक काकडे फक्त 100 फॉर्म आलेले आहे .असे सांगण्यात येत आहे सर्वसामान्य लोकाला फॉर्म मिळत नाही तरी मंडळांनी फॉर्मची व्यवस्था वेबसाईटवर पीडीएफ द्वारे करावी ही विनंती
पीडीफ उपलब्ध नाही सर आमच्या कडे
PDF उपलब्ध नाही आहे का सर