वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी २०२२ | असा करा ऑनलाईन अर्ज

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2022

 मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील ३० व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजना  सन २०२२-२३ मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण रू. ५१.०० कोटीचा कार्यक्रम सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत vaiyktik shettale astarikaran yojana 2022 अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. ५१.०० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रू. ५१.०० कोटी नियतवाटप मंजूर केलेले आहे.

सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प मुल्य रक्कम रु. १०१.०० कोटी असून उक्त प्रकल्प राबविण्यास रू. ५१.०० कोटी अनुदानाच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शेततळे अनुदान योजना 2022 । 

१. सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत “वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प” राज्यात राबविण्यास रू. ५१.०० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रू. ५१.०० कोटी निधी RKVY अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

२. सदर प्रकल्प एका वर्षाच्या कालावधीत राबवावयाचा असून रू. ५१.०० कोटी निधीचे नियतवाटप (allocation) मंजूर करण्यात येत आहे. तथापि, शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीच्या प्रमाणात वर्ष निहाय उपलब्ध करून द्यावयाच्या नियतवाटपात वाढ/घट करण्याचे अधिकार शासनास राहतील.

३. सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येईल.

 ४. मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के राहील. 

५. राज्यास प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थिक लक्षांकाचे राज्यातील सर्व जिल्ह्यांना/तालुक्यांना समन्यायी प्रमाणात वाटप करावायचे असून सदर आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत शेतकऱ्यांची निवड करण्याची मुभा राहील. 

६. विभागाच्या महाडिबीटी प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन मागवून घ्यावेत. प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांची निवड सोडत पध्दतीने करण्यात यावी. 

७. निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम प्राधिकारी यांनी पूर्व संमती द्यावी. काम पूर्ण झालेल्या कामाची अधिकृत अधिकाऱ्यामार्फत मोका तपासणी करण्यात यावी. नंतरच वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्पाकरिता अनुदान अनुज्ञेय राहील. 

८. लाभार्थ्याने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ-टॅगींग द्वारे करण्यात याव्यात. 

९. या प्रकल्पांतर्गत अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना मार्गदर्शक सूचनांनुसार विहित प्रमाणात प्राधान्याने अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.

 १०.प्रस्तुत प्रकल्प राबविण्याकरिता निधी वितरणाची कार्यवाही राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष, कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून करण्यात येईल. 

११.प्रकल्पाची अंमलबजावणी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे सनियंत्रणाखाली कृषि विभागामार्फत करण्यात यावी.

१२.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेचा आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल विहित मुदतीत केंद्र शासनाला तसेच राज्य शासनाला सादर होईल याची दक्षता घ्यावी. 

१३. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात यावा. सदर निधी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अखर्चित राहणार नाही याची अंमलबजावणी यंत्रणांनी काळजी घ्यावी.

शेततळे प्लास्टिक किंमत |  वैयक्तिक शेततळे अस्तरीकरन साठी आकारमाना नुसार देण्यात येणारे अनुदान 

  • 15x15x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 28 हजार 275 रुपये मिळतील.
  • 20x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 31 हजार 598 रुपये मिळतील.
  • 20X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 41 हजार 218 रुपये मिळतील.
  • 25X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 49 हजार 671 रुपये मिळतील.
  • 25x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 58 हजार 700 रुपये मिळतील.
  • 30x25x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 67 हजार 728 रुपये मिळतील.
  • 30x30x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त मिळणारे अनुदान रक्कम 75 हजार रुपये असेल.

शेततळे अनुदान योजना २०२२ online Form 

सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येणार आहे .महाडिबीटी प्रणालीमार्फत अर्ज ऑनलाईन करावे लागणार आहे .प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांची निवड सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2022
वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी 2022

शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना 2022 असा करा ऑनलाईन अर्ज 

  • सर्व प्रथम तुम्हाला mahadbt च्या ऑफिशियल वेबसाईट वर जावे लागेल. home page वर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2021

 

  • लॉगिन केल्या नंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल त्यावर अर्ज करा या ऑपशन वर क्लिक करा.

शेततळे अनुदान योजना 2021

 

  • पुढे सिंचन साधने व सुविधा या ऑपशन पुढे बाबी नाव या ऑपशन वर क्लिक करा.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2021

 

  • पुढे एक फॉर्म उघडेल त्यामध्ये सर्वे नंबर , मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हे ऑपशन निवडा , पुढे बाब मध्ये शेतातील तळ्यामध्ये प्लास्टिक अस्तर हे ऑपशन निवडा, नंतर परिमाण मध्ये तुमच्या शेततळ्याचे क्षेत्रफळ निवडा , आणि शेवटी संमती पत्र बॉक्स ला टिक करून जतन करा या बटण वर क्लिक करा.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2021

 

  • पुढे ऑनलाईन पेमेन्ट चे ऑपशन येईल त्यामध्ये तुम्हाला २३.६० रुपये ची पेमेन्ट करायची आहे.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2021

 

  • पेमेन्ट करण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग , डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड,upi एवढे ऑपशन दिले आहेत यापैकी तुम्ही तुमच्या कडे जे आहे त्यातून पेमेन्ट करा. आणि पेमेन्ट झाल्यावर receipt डाउनलोड करून घ्या.

वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2021


दुसऱ्या नवीन योजना

2 thoughts on “वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी २०२२ | असा करा ऑनलाईन अर्ज”

  1. शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजना

    Reply

Leave a Comment