ठिबक तुषार सिंचन ५५% अनुदान GR आला

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

ठिबक तुषार सिंचन योजना ५५% अनुदान GR आला

प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सन 2020-21 या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याच्या वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्श्याचा उर्वरित रु.4348 लक्ष निधी वितरीत करण्यात येणार आहे.

सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक घटकासाठी सन २०२०-२१ या वर्षामध्ये केंद्र हिश्श्याचा रु. ३०००० लक्ष निधी वितरीत केला असून त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या रु.२३४०० लक्ष निधीचा समावेश आहे.

ठिबक तुषार सिंचन योजना ५५% अनुदान GR आला

केंद्र हिश्श्याच्या सदर निधीच्या प्रमाणात समरूप राज्य हिश्श्याचा रु. १५६०० लक्ष निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक होते तथापि, संदर्भाधिन दि. ०१ जानेवारी, २०२१, दि.३१ मार्च, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र हिश्श्याचा रु.२३४०० लक्ष व राज्य हिश्श्याचा रु.७०१२ लक्ष निधी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन व दि.०८ जून,२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य हिश्श्याच्या उर्वरित रु.८५८८ लक्ष निधीपैकी रु.४२४० लक्ष निधी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला आहे.

सबब राज्य हिश्श्याच्या उर्वरीत रु. ४३४८ लक्ष निधीचे वितरण सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

👉👉ठिबक तुषार सिंचन योजना ५५% अनुदान GR पहा 👈👈


दुसऱ्या योजना 

1 thought on “ठिबक तुषार सिंचन ५५% अनुदान GR आला”

Leave a Comment