शबरी घरकुल योजना 2023 GR | shabari awas gharkul yojana 2023
शासन निर्णय :-
यानुसार अगोदर असलेले २४०७५ आणि आता नवीन मंजूर झालेले ६९२१३ असे मिळून एकूण ९३२८८ घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादेत आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
२. संदर्भ क्र. ११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देतांना वाचा येथील दिनांक २८.०३.२०१३ व दि. ५.१.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे.
३. संदर्भ क्र.१३ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
४. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) करुन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
५. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन नियमांचे व कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यानुसार शबरी योजना २०२३ मंजूर घरकुल यादी खालील प्रमाणे आहे
अधिक माहिती साठी तुम्ही Gr डाउनलोड करून वाचू शकता
दुसऱ्या योजना पहा