प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2022 अर्ज सुरू

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2022 । Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2022

योजनेचे नाव  प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2022
योजनेचा उद्देश  देशातील मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन आणि उभारी देणे हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली / PMMSY launch Date 20 मे 2020 रोजी

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2022 : या योजनेअंतर्गत एकात्मिक तटीय मासेमारी गावांचा विकास, जलचर संदर्भ प्रयोगशाळा, रोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा, जलशेती  विस्तार सेवा, ‘बायोफ्लॉक’, मासेमारी नौका नवीन / उन्नतीकरणासाठी साहाय्य, सेंद्रिय जलशेतीला प्रोत्साहन,अत्याधुनिक घाऊक मासे बाजार, प्रमाणीकरण आणि संभाव्य मासेमारी क्षेत्र (PFZ ) उपकरणे, अशा विविध नवीन उपक्रम व क्षेत्रावर देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

PMMSY Maharashtra या योजने अंतर्गत मत्स्य व्यवसायाला लागणारी साधन सामग्री जसे कि, फ्रीज, शीत वाहन, मस्त्य बीज निर्मिती केंद्र, बर्फाचे कारखाने, मस्त्य खाद्य निर्मिती केंद्र, मस्त्य विक्री साठी लागणारी जागा तसेच स्टॉल, विविध प्रकारचे मस्त्य पालन साठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. 

मत्स्य पालन योजना महाराष्ट्र 2022

या योजनेचा लाभ घेणाऱ्या साठी  general प्रवर्गासाठी ४०% अनुदान देण्यात येणार आहे.

आणि SC/ST लाभार्थी महिला यांना ६०% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY ही देशातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून या योजनेद्वारे देशांमध्ये रुपये २०,०५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२२ -२३ लाभार्थी कोण असणार 

 • केंद्र सरकार आणि त्यातील घटक
 • केंद्रशासित प्रदेश /राज्य सरकारे आणि त्यांची संस्था
 • उद्योजक आणि खासगी कंपन्या सुद्धा लाभ घेऊ शकतात. 
 • राज्य मत्स्यव्यवसाय विकास मंडळे (SFDB)
 • मासे उत्पादक संघटना / कंपन्या (FFPO / CS)
 • मासे कामगार आणि मासे विक्रेते
 • मासे उत्पादक
 • मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ
 • अनुसूचित जाती / जमाती / महिला / वेगळ्या सक्षम व्यक्ती
 • मत्स्यव्यवसाय क्षेत्रात बचत गट (बचत गट) / संयुक्त दायित्व गट (JLG)
 • मत्स्यपालन सहकारी
 • मत्स्यव्यवसाय फेडरेशन

गोड्या पाण्यातील मत्स्य बीज उत्पादन केंद्राची स्थापनाकरण्यासाठी  योजनेच्या अटी व शर्ती

 • त्स्य बीज उत्पादन केंद्राची उत्पादन क्षमता कमीत कमी 15 दशलक्ष मत्स्यबीज वर्षे उत्पादन केंद्र किंवा ६ कोटी मत्स्यबीज उत्पादन केंद्र असावी प्रकल्प कमीत कमी 0.50 हेक्‍टर जागेमध्ये उभारावा लागेल.
 • भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमीनीच्या जमीन भाडेपट्टी कालावधी करार प्रकल्प अहवाल सादर केलेल्या दिवसापासून किमान कालावधी पासून १० वर्षापेक्षा कमी नसावा याबाबतची नोंदणीकृत कागदपत्रे प्रकल्प अहवालामध्ये नमूद असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याने प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे कागदपत्र व सदरची जमीन अतिक्रमण विहिरीत एक तर स्वतःचे नावे नोंदणीकृत भांडण भाडेकरार कागदपत्र असल्याचा कागद कागदोपत्री पुरावा सादर करेल बँक वित्तीय संस्थांमार्फत प्रकल्प खर्चाच्या बिगर अनुदानाच्या भागासाठी कर्ज देण्यास मान्यता दिली आहे किंवा लाभार्थ्याने प्रकल्पाकरिता स्वतः गुंतवणूक करणार असल्याचे घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
 • कोळंबी बीज उत्पादन केंद्राची उत्पादन क्षमता कमीत कमी 30 दशलक्ष पोस्ट वर वर्षे उत्पादन केंद्र असावी.
 • प्रकल्प कमीत कमी 0.5 एकर जागेमध्ये उभारावा कोळंबी बीज उत्पादन केंद्राचे व्यवस्थापन तांत्रिक कर्मचाऱ्यांनी करणे आवश्यक आहे.
नवीन मत्स्यबीज संवर्धन तलाव बांधकाम (Nursery/seed rearing ponds) साठी अनुदान 
 •  प्रतिहेक्‍टरी प्रकल्पासाठी  शासकीय ७ लाख रुपये प्रकल्प खर्च देण्यात येणार असून त्यात  सर्व साधारण प्रवर्गासाठी 40% अनुदान मिळेल आणि SC/ST लाभार्थी महिला यांना ६०% अनुदान देण्यात येईल.
नवीन मत्स्य संगोपन तलाव बांधकामासाठी प्रकल्प खर्च 
 •  प्रतिहेक्‍टरी प्रकल्पासाठी  शासकीय ७ लाख रुपये प्रकल्प खर्च देण्यात येणार असून त्यात  सर्व साधारण प्रवर्गासाठी 40% अनुदान मिळेल आणि SC/ST लाभार्थी महिला यांना ६०% अनुदान देण्यात येईल.
पूर्ण माहिती आणि कागदपत्रासह हा प्रकल्प फॉर्म मस्त्य व्यवसाय विभागाकडे सादर करायचा आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२२ फॉर्म pdf 

👉PMMSY Download Application form here


दुसऱ्या योजना 

Leave a Comment