उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२ । osmanabad Sheli gat vatap yojana 2022
योजनेचे नाव | उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२ |
कधी पासून सुरु होणार अर्ज | २७ जून २०२२ पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. |
प्रसिध्दी पत्रक पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद. नुसार ४ योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
योजना १ – जिल्हास्तरीय अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत अनु.जाती / नवबौध्द लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणेसाठी अर्ज मागणी :
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रती तालुका ३० प्रशिक्षणार्थी या प्रमाणे एकूण २४० प्रशिक्षणार्थीचे उदिष्ठ असून पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची निवड अनुसुचित जाती मधून करण्यात येईल, त्यामध्ये ३० टक्के महिला व ५ टक्के अपंगासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागा मार्फत विविध योजने अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थीना प्रधान्याने प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण ३ दिवसाचे असून शासन निर्णयानुसार प्रती प्रशिक्षणार्थी १,०००/- रुपये मर्यादेत (सर्व अनुषंगिक बाबीवर) खर्च करण्यात येईल.
यासाठी लागणारी कागदपत्र –
- जातीचा दाखला
- ग्राम पंचायत शिफारस
- साक्षांकित फोटो
- आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे जमा करायचा ?
- अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे.
पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण साठी अर्ज PDF
योजना २ – दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम):
या योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर दभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) अंतर्गत वैरण बियाणे वाटप करणेसाठी सन 2022-23 या वर्षासाठी एकूण 3333 लाभाथींचे उदिष्ठ असून यामध्ये रुपये 1500/- मर्यादेत सुधारित वैरण बियाणे / ठोंबे वाटप करण्यात येतील.
या योजनेसाठी लाभार्थीची निवड पात्रता :
(१) अल्प
(२) अत्यल्प भुधारक शेतकरी
(3) लाभार्थीकडे 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक आहे.
यासाठी लागणारी कागदपत्र –
- आधार कार्ड
- ७/१२ लागेल
- पासपोर्ट फोटो
अर्ज करायचा पत्ता : योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
बियाणे मागणीसाठी अर्जाचा विहित नमुना pdf फॉर्म
योजना ३ – नाविण्यपुर्ण योजना विधवा महिला लाभार्थींना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर) योजनांसाठी अर्ज मागणी
या योजने अंतर्गत जिल्हयातील विधवा महिला लाभार्थिना 100 टक्के अनुदानावर 02 शेळया वाटप करणे, (प्रति लाभार्थि 02 शेळी किंमत रु.16,000/- व 3 वर्षाचा विमा रु.1012/असे एकूण रु. 17,012/- गटाची किंमत )
सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल. एका विधवा महिलांस २ उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येईल. हा अर्ज पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे.
नाविण्यपुर्ण योजना विधवा महिला शेळी गट वाटप लागणारी कागदपत्र
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र)
- दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्राम सेवक यांचे प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा व ८अ उतारा/ ग्रामपंचायतनमुना नं.८
- राशन कार्ड / शिधा पत्रिका सत्य प्रत
विधवा महिला लाभार्थींना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप अर्जाचा नमुना फॉर्म
योजना ४ – नाविण्यपुर्ण योजना दिव्यांगाच्या कुटुबांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर योजना) योजनांसाठी अर्ज मागणी
या योजने अंतर्गत जिल्हयातील दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 टक्के अनुदानावर 02 शेळया वाटप करण्यात येणार आहेत. (प्रति लाभार्थि 02 शेळी किंमत रु.16,000/- व 3 वर्षाचा विमा रु.1012/असे एकूण रु. 17,012/- गटाची किंमत असून हे अनुदान दिव्यांग लाभार्थ्यास देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थिना देण्यात येईल. एका दिव्यांग लाभार्थिला २ उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येणार आहे. हा अर्ज पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे.
यासाठी लागणारी कागदपत्र :
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र)
- दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्राम सेवक यांचे प्रमाणपत्र
- ७/१२ उताराव ८अ उतारा/ ग्रामपंचायतनमुना नं.८
- शिथा पत्रिका सत्य प्रत / राशन कार्ड
- दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक)
दिव्यांगांना १०० टक्के अनुदानावर शेळी गट वाटप साठी अर्जाचा नमुना
दुसऱ्या नवीन योजना
- कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 | या जिल्ह्यात अर्ज सुरू
- महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ । Mahila swayamsidhi karj partawa yojana 2022
- प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2022 अर्ज सुरू