New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र अर्ज सुरु

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र,अर्ज सुरु

परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधार सेवा केंद्र अर्ज सुरु झाले आहेत.

परभणी आधार सेवा केंद्र -अर्ज सुरु

सद्यस्थितीत शासकीय कामासाठी, बँकेच्या कामासाठी प्रत्येक नागरीकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नावाची दुरुस्ती, जन्मतारखेत बदल यासारख्या दुरुस्ती व नविन नोंदणीसाठी नागरिकांना शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे.

त्यामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये व त्यांना त्यांचे जवळच्या आधार केंद्रावर आधार नोंदणी व दुरुस्ती करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खालील मंडळाचे ठिकाणी निकष पात्र असणा-या आपले सरकार सेवा केंद्रचालक यांना आधार नोंदणी संचाचे वितरण करण्यात येणार आहे.

New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र अर्ज सुरु

अर्ज सादर करायचा पत्ता – करीता वरील निषक पुर्ण करणारे आपले सरकार सेवा केंद्रचालक यांनी दि. 15.11.2021 ते 24.11.2021 या कालावधीत त्यांचे अर्ज जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयास परभणी येथे सादर करावेत.

सदर कालावधीत प्राप्त अर्जाचाच विचार करण्यात येईल. अर्जाचा नमुना _यासोबत जोडण्यात येत असून सदर नमुन्या अर्ज सादर करावा.

परभणी जिल्ह्यात आधार संच वाटप प्रेसनोट – जाहीर प्रगटन व अर्जाचा नमुना «


कोल्हापूर New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र,अर्ज सुरु

महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांच्याकडील पत्र व मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांच्या सुचने अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरु करणेची कार्यवाही सुरु करणेत येत आहेत. दि. 01 नोव्हेंबर 2021 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वत:चे खाजगी आधार संच असणाऱ्या  10 डिसेंबर 2021 या अंतिम दिनांकानंतर आलेले कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती व इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी ज्या अर्जदारांनी खाजगी आधार संच सुरु करणेकरीता इकडे मागणी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदार यांनी या प्रेस नोट अन्वये नव्याने अर्ज करणेचे आहेत.

अर्ज सादर करायचा पत्ता – इच्छुक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE) यांनी “जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (टपाल शाखा)” येथे समक्ष कागदपत्रासह अर्ज जमा करणे बंधनकारक आहे.

 सेंटर उभारणीसाठी आवश्यक सुचना व अर्जासोबत जोडणेची कागदपत्रे :
  • स्वत:चा आधार संच असलेबाबतचे व ते विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करणेस मान्य असलेले प्रतिज्ञापत्र (परिशिष्ठ अ).
  • शासकीय अधिकारी यांचे VLE च्या नावे परवानगी पत्र अथवा ना हरकत दाखला अथवा शासकीय जागेचे VLE च्या नावाचे करारपत्र.
  • आधार कार्डची प्रत व रहिवासी पुरावा
  • आधार सुपर वायझर प्रमाणपत्र
  • १ जानेवारी २०२० ते 30 सप्टेंबर २०२१ अखेर आपले सरकार सेवा केंद्राची व्यवहारांची संख्या | (Transaction Entry) पुरावा
  • वयाचा दाखला
  • जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकानंतरचे पोलिस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
  • परिशिष्ठ अ व परिशिष्ठ ब .
आपले सरकार केंद्र चालकाकडे आवश्यक पाहिजे असलेली उपकरणे
  •  Laptop 
  •  TFT Monitor 
  •  Printer 
  • Web camera 
  •  Lamp 
  •  GPS 
  •  White Background 
  • Fingerprint scanner 
  •  Iris 
कोल्हापूर आधार केंद्र लिस्ट 
New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र अर्ज सुरु
New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र अर्ज सुरु

Leave a Comment