नाविन्यपूर्ण योजना 2022 अर्ज सुरु Navinya purna yojana online application 2022
ah.mahabms.com online application, Navinya purna yojana all documents, Navinya purna yojana form,navinya purna yojana form pdf Navinya purna yojana last date, Navinya purna yojana online form, Navinya purna yojana website, नाविन्यपूर्ण शेळीपालन अनुदान योजना 2021, Navinya Purna Yojana maharashtra, Navinya Purna Yojana in Marathi, Navinya Purna Yojana gr, Navinya purna yojana 2021, Navinya Purna Yojana online Form, mahabms online application 2021
योजनेचे नाव | नाविन्यपूर्ण योजना 2022 । Navinya purna yojana 2022 |
अर्ज करण्याची तारीख | —- |
Navinya purna yojana 2022 अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांनातसेच आपल्या पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपूर्ण योजना 2022 हा उपक्रम सुरु केला असून यामध्ये विविध घटकांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार असून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी कागदपत्र आणि पात्रता खाली दिले आहेत ते बघून तुम्ही पात्र असाल तर अर्ज करा.
navinya purna yojana online application 2022-23
या योजनेमध्ये तुम्ही २ प्रकारे अर्ज करू शकता एक यांच्या अधिकारीक वेबसाईट वर जाऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे मोबाईल मध्ये AH-MAHABMS हे अँप्लिकेशन डाउनलोड करून यातून तुम्ही अर्ज करू शकता. याची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून app डाउनलोड करा.
नाविन्यपूर्ण योजना 2022 चे ३ प्रकार आहेत
१) योजनेचे नाव – सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे.
२) योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.
३) योजनेचे नाव – १००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.
नाविन्यपूर्ण योजना 2022 पात्रता / लाभार्थी निवडीचे निकष – गाई, म्हशी गट वाटप साठी
- अल्प भूधारक शेतकरी ज्यामध्ये १ हेक्टर २ हेक्टर जमीन असणारे शेतकरी बांधव.
- सुशिक्षित बेरोजगार ज्यांची रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असायला पाहिजे.
- महिला बचत गट अ .क्र . २ ते ३ मधील
नाविन्यपूर्ण योजना 2022 साठी लागणारी कागदपत्रे
- आधारकार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक सत्यप्रत
- सातबारा ७/१२
- ८ अ उतारा
- ओळखपत्राची सत्यप्रत
- ग्रामपंचायत नमुना नंबर ८
- अपत्य दाखल / स्वघोषणा पत्र
- अर्जदाराची स्वतःची जमीन नसल्यास भाडे तत्वावर जमीन घेतलेले संमती पात्र सातबारा व ८ अ उताऱ्यासह
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता)
- अनुसूचित जाती /जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
- दिव्यांग असल्यास दाखला
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- रोजगार , स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रक्षिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाइट – https //ah.mahabms.com 2022
अर्ज भरते वेळेस जो मोबाईल नंबर दिला आहे तो नंबर बदलू नये कारण त्या नंबर वरती SMS येणार आहेत या योजने लाभार्थी निवड बद्दल.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे डाउनलोड करा :
AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर) |
navinya purna yojana online application 2022 – असा करा तुमच्या मोबईल वरून अर्ज
स्टेप १ : वरील अँप डाउनलोड केल्यानंतर ते अँप्लिकेशन उघडा,आणि अर्जदार नोंदणी या ऑपशन वर क्लिक करा.
- क्लिक केल्या नंतर महत्वाची माहिती दिसते, ते वाचून बंद करा या ऑपशन वर क्लिक करा .
स्टेप २ : क्लीक केल्या नंतर आपल्या समोर अर्ज उघडेल त्यामध्ये आपली वयक्तिक माहिती भरायची आहे . त्यामध्ये तुमचा आधार नंबर ,वय , नाव (इंग्लिश /मराठी ), मोबाईल नंबर , लिंग, जिल्हा, तालुका . गाव , जात ,दिव्यांग, दारिद्र्य रेषा , शैक्षणिक पात्रता, राशन कार्ड नंबर,
स्टेप ३: अर्जदाराच्या बँकेचा तपशील यामध्ये
- बँकेचे नाव
- खाते क्रमांक
- IFSC क्रमांक
- शाखा
स्टेप ४ : अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी
- अर्जदाराचा फोटो ८० kb च्या आत अपलोड करा.
- आणि स्वाक्षरी ४० kb च्या आत अपलोड करा.
स्टेप ५ : अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा
- अर्जदाराने एकूण कुटूंब संकेतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्ड वर दिल्या प्रमाणे भरवीत.
- आणि नियम व अटी मला मान्य आहेत या बॉक्स ला टिक करून पुढे चला या बटण वर क्लिक करा.
- पुढे मी रोबोर्ट नसून मनुष्य आहे हे सिद्ध करण्यासाठी फोटो कॅप्टचा सांगेल त्या फोटो सिलेक्ट करा.
- त्यानंतर आपली माहिती जतन केली जाईल. माहिती जतन झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर आधार कार्ड क्रमांक आणि आपला पासवर्ड येईल.
स्टेप ६ : आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे .
- लॉगिन केल्यानंतर परत एकदा आपल्या समोर कॅप्चा कोडे येईल तो भरा . कॅप्चा भरल्या नंतर आपल्याला verify वर क्लिक करा .
- verify केल्या नंतर लॉगिन होईल आणि आपल्या पुढे आपण भरलेली माहिती येईल जसे कि आपले नाव , मोबाईल नंबर , जात प्रवर्ग ही माहिती दिसेल .
- त्याच खाली आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा ते निवडायचे आहे. सगळ्या योजनांसाठी एकदाच अर्ज भरू शकता त्यासाठी सगळ्या दिसतील त्या योजनांना टिक करून सिलेक्ट करा.
- आणि खालील सूचना वाचून बंद करा या बटण वर क्लिक करा.
स्टेप ७ : पुढे आपण सिलेक्ट केलेल्या योजना दाखवल्या जातील , खाली दिलेल्या पुढे चला या बटण वर क्लिक करा. नंतर पुढे तुम्हाला होय /नाही या पद्धतीच्या १० प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. ते प्रश्न वाचून होय /नाही जो बरोबर असेल तो पर्याय सेलेक्ट करून पुढे चला या बटण वर क्लिक करा. अशा प्रकारे पुढील सर्व प्रश्नांची ऊत्तरे द्या .
- सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पुढे चला या ऑपशन वर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर येईल नियम व अटी वाचून वरील नियम व अटी मला मान्य आहेत याला टिक करून पुढे चला वर क्लिक करा.
- क्लिक केल्या नंतर आपल्या पुढे आपला भरलेला अर्ज दिसेल त्या फॉर्म वर आपण भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल. माहिती वाचून बरोबर आहे का याची खात्री करा आणि जर काही बदल करायचे असतील तर आताच बदल करू शकता आणि माहिती बरोबर असेल तर जतन करा या ऑपशन वर क्लिक करा.
- जतन केल्या नंतर पुढे तुम्हाला मला मान्य आहे या ऑपशन ला टिक करून जतन करा या ऑपशन वर क्लिक करा.
- जतन वर क्लिक केल्या नंतर आपल्या समोर कॅप्चा कोडे येईल तो verify केल्यानंतर आपला अर्ज save होईल .
- आता आपण फॉर्म ची प्रिंट काढू शकता. किंवा याबद्दल ची माहिती स्टोअर करून ठेवू शकता.
- नंतर फॉर्म उघडून पाहण्यासाठी सुरुवातीला दिलेला आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता.
तुमची निवड झाल्या नंतर खाली दिलेली बंध पत्राचे नमुने दिले आहेत ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून आपल्या कागद्पत्रा सोबत देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता
अधिक माहिती साठी
टोल फ्री क्रमांक : १९६२ किंवा १८००-२३३-०४१८
- योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या टोल फ्री नंबर वर कॉल करा
- किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नवीन योजनांच्या माहिती साठी home बटण वर क्लिक करा
दुसऱ्या नवीन योजना पहा
- उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना लिस्ट 2022। Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022
- प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये e shram pension card Yojana Maharashtra । असा करा ऑनलाईन अर्ज
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१-२२ अर्ज
- रमाई आवास घरकुल योजना 2021 pdf download
- pm kisan samman nidhi yojana status check
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना |ऑनलाईन अर्ज सुरु
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म