शेळी गट वाटप योजना २०२१ | अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

शेळी गट वाटप योजना २०२१ | अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

१० शेळी १ बोकड, १०० कुकुट पक्षी गट वाटप अनुदान योजना, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ७५% अनुदानावर १० शेळी १ बोकड अशा शेळी गटाचा लाभ दिला जातो. 

या योजने अंतर्गत नगर जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१ साठी वैयक्तिक शेळी गट वाटप योजना व एक दिवशीय कुकूट पिल्ले (१००) गट वाटप योजनेसाठी ६७ लाख २१ हजार रुपयाचा निधी उपलबध झाला आहे त्यामुळे शेळी गट वाटप योजनेसाठी ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

तरी इच्छुक लाभार्थ्यांनी या योजने साठी जास्तीत अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

शेळी आणि बोकड किंमत

  • शेळी –  ८ हजार रुपये प्रति शेळी
  • बोकड – ११ हजार रुपये बोकड 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत 
  • दारिद्रयरेषेखाली असल्याचा दाखला
  • 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
  • जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
  • बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
  • रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नांदणी कार्डची सत्यप्रत.
  • अपत्य दाखला (ग्राम पंचायत यांचा)

 

तुम्हाला तुमचा अर्ज पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामध्ये सर्व कागदपत्र आणि वयक्तिक माहिती भरून जमा करायचा आहे.

 

⇒शेळी गट वाटप योजना २०२१ नगर अर्ज


दुसऱ्या संबंधित योजना

Leave a Comment