मुरघास सायलेज बेलर मशीन अनुदान 2022 अर्ज सुरू | Murghas machine subsidy
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन अनुदान 2022 परभणी व लातूर जिल्ह्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
केंद्र शासनाने Rashtriy Pashudhan vikas abhiyan 2022 अंतर्गत सन 2021-22 या वर्षात मुरघास निर्मिती करीता “सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत प्रती मुरघास निर्मिती युनिट प्रकल्प ( silage beler Machine Unit ) खर्च २० लाख रुपये येवढा आहे. त्यानुसार ५० टक्के केंद्र हिस्सा म्हणजे 10 लाख रुपये निधी असुन उर्वरीत 50 टक्के रु.10.00 लाख रुपये संस्थेने स्वत: खर्च करायचे आहेत. जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादन संघ/संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी, स्वयं सहाय्यता बचतगट व गोशाळा/पांजरपोळ संस्था यांना द्यावयाचा आहे.
Murghas machine subsidy योजनेचे लाभार्थी :
- जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादन संघ/संस्था,
- शेतकरी उत्पादन कंपनी
- स्वयं सहाय्यता बचतगट व गोशाळा/पांजरपोळ संस्था यांना द्यावयाचा आहे.
- गोरक्षण संस्था
- जिल्ह्यातील एकाच संस्थेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
⇓ लातूर जिल्हा ⇓ |
राष्ट्रीय पशुधन अभियान 2021-22 सर्वसाधारण प्रवर्ग अंतर्गत (एनएलएम) मुरघास निर्मिती करिता लातूर जिल्ह्यामध्ये 01 सायलेज मुरघास बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. नानासाहेब सखाराम कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अर्जाची शेवटची दिनांक : 25 जानेवारी 2022 ते 01 फेब्रुवारी 2022 तारखेपर्यंत
Murghas machine subsidy yojana 2022 latur अर्ज कोठे करायचा –
सदर अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (वि) यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
⇓ परभणी जिल्हा ⇓ |
या योजनेची परभणी जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत असून परभणी जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील 2 संस्थांना चालु वर्षी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्जाची शेवटची दिनांक : 4 फेब्रुवारी 2022
Murghas machine subsidy yojana 2022 Parbhani अर्ज कोठे करायचा –
“सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य” योजनेच्या अर्जाचा नमुना, मार्गदर्शक सुचना व बंधपत्र तालुकास्तरावर उपलब्ध आहे तरी इच्छुक संस्थांनी संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती मधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयीन वेळेपुर्वी स्वयंपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन डॉ.पी.पी.नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी यांनी केले आहे.
silage beler Machine Unit yojana 2022
- सायलेज बेलर
- किमान 2 मे. टन प्रति तास क्षमतेचे हेवी डयुटी कडबाकुटी यंत्र
- ट्रॅक्टर व ट्रॉली
- वजन काटा
- हार्वेस्टर
- मशीन शेड
- या सर्वांचा प्रकल्प खर्च २० लाख रुपये असून याच्या ५० % म्हणजे १० लाख रुपये अनुदान मंजूर होते.
संस्थेने / लाभार्थ्यांने मशनरीची खरेदी केल्यानंतर पडताळणी करुन निधी संस्थेच्या / लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.
दुसऱ्या योजना