शेत रस्ते मंजूर यादी आली | मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

शेत रस्ते मंजूर, यादी आली | Matoshri Gram Samrudhi shet panand raste yojana list 2022

मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022 राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 

ही योजना राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास आज ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत सर्व शेतांपर्यत मजबूत व दैनंदिन कामासाठी वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधबांधण्यात येणार आहेत.

सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा सन 2021-22 या आर्थथक वर्षासाठीच्या “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या” आराखड्यात समावेश करण्यास पुढील अटी व शर्ती यांच्या अधीन राहुन शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना 2022

या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी अंदाजपत्रके बनवण्यात येत आहे. यामध्ये मनरेगा-कुशल घटक, अकुशल घटक राज्य रोहयो- कुशल घटक याप्रमाणे 

  • खडीकरणासह पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे – 23 लाख 84 हजार इतके
  • मुरमाच्या पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे – 9 लाख 76 हजार रुपये इतके

  होते. तथापि ज्या ज्या वेळी ‘डीएसआर’ बदलेल त्याप्रमाणे अंदाजपत्रक बदलेल. शेत/पाणंद रस्ता तयार करण्यासाठीचे मापदंड निश्चित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्राम विकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी विहित केलेले मापदंड लागू राहतील. रस्ते तयार करण्यासाठीच्या सुस्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते सहमती प्रदान कामांची यादी २०२२

 

मंजूर रस्त्यांची यादी PDF – पहा ⇐


दुसऱ्या योजना 

Leave a Comment