महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ । mahila bachat gat yojana 2022

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ । Mahila swayamsidhi karj partawa yojana 2022

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांकरिता महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना / महिला विकास योजना 2022  राबविण्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ उद्देश

१. महिला बचत गट कर्ज योजना 2022 राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीतालागू असेल. इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा उद्देश सदर योजनेचा असल्याने महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु.५.०० ते रु.१०.०० लक्षपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 २. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येईल. 

महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ योजनेचे स्वरुप

  1. हिला आर्थिक विकास महामंडळाच्या CMRC मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान ५०% इतर मागास प्रवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
  2.  पात्र महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळाकडून घेता येईल. तसेच सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तसेच इतर शासकीय विभागाच्या / महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
  3. इतर मागास प्रवर्गातील किमान ५०% माहलाचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्प्यात रु.५.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल.
  4.  प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्यात रु.१०.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन मंजुर करुन घेण्यास पात्र होईल.
  5.  बँकेकडुन मंजुर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.(mahila bachat gat loan)

 अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी व शर्ती :

  •  महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  •  पात्र महिलांचे किमान वय १८ आणि कमाल वय ६० वर्षे पाहिजे.

महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ कागदपत्र 

  • अर्जदारास सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला (OBC) 
  • वयाचा पुरावा – उदा. जन्म तारखेचा पुरावा / शाळा सोडल्याचा दाखला. 
  • रहिवासी दाखला – (आधार कार्ड, ३ महिन्यातील लाईट बिल,फोन बिल झेरॉक्स, प्रॉपर्टी कार्ड, व्होटर कार्ड,पासपोर्ट)
  • बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स.
  • बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचेप्रमाणपत्र अथवा स्वयं-घोषणापत्र.

 अर्जदार महिलेने कोणत्याही वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा किंवा महामंडळामार्फत राबवीत येत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास पुर्वीच्या कर्ज रक्कमेची संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र / स्वयं-घोषणा /प्रतिज्ञापत्र लाभार्थीने सादर करणे आवश्यक राहील.

👉महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ – GR Pdf 


महिला स्वयंसिद्धी कर्ज परतावा योजना २०२२ कार्यपद्धती

१. महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.

२. CMRC मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर विहित पध्दतीने तपासणी करुन सदर प्रस्ताव ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत ओबीसी महामंडळाच्या मुख्यालयाकडे पात्रता प्रमाणपत्र (Letter of Intent) निर्गमित करण्याच्या कार्यवाहीकरीता सादर करण्यात येईल.

 ३. ओबीसी महामंडळाच्या मुख्यालयामार्फत संबंधीत प्रस्तावात LOI पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करुन त्याची प्रत CMRC ला पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात येईल.

 ४. ओबीसी महामंडळाकडुन निर्गमित केलेल्या पात्रता प्रमाणपत्राची (Letter of Intent) वैधता १ वर्ष राहील. 

५. LOI द्वारे बँकेने मंजुर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटास त्यांच्या भरणा केलेल्या १२% पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज रक्कमेच्या परताव्याची मागणी बँकेच्या प्रमाणिकरणानुसार महामंडळाच्या पोर्टलवर करण्यात यावी. 

६. CMRC च्या प्रमाणिकरणानंतर व्याज परताव्याची रक्कम बचत गटाच्या बँक खात्यामध्ये महामंडळामार्फत त्रैमासिक पध्दतीने वर्ग करण्यात येईल.

mahila bachat gat loan 2022, mahila bachat gat yojana 2021,mahila bachat gat yojana 2022


दुसऱ्या योजना पहा 

Leave a Comment