पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Rain Update june 2023

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Rain Update june 2023

मान्सूनने ७ जूनला केरळमध्ये हजेरी लावली आहे. नैऋत्य मौसमी वान्यांनी हळूहळू केरळ, कर्नाटकाचा काही भाग व्यापला असून, मान्सूनची महराष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात मान्सून हजेरी लावेल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस हवामान विभागाकडून महाराष्ट्राला यलो अलर्ट (Rai forecast) देण्यात आला आहे. ११ जून आणि १२ जून रोजी महाराष्ट्रातील काही भागात वादळी वान्यांसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या भागाला बिपरजॉयचा तडाखा बसणार असणार असल्याने या भागात १५ जूनपर्यंत तर, गोवा, महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पुढचे ११ जून आणि १२ जून या दोन दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. तर संपूर्ण विदर्भात १५ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मान्सूनपूर्व वादळी पावसाची अधिक शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट (Rai forecast) करण्यात आले आहे.

पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Rain Update june 2023

सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीलगत बिपरजॉय आणखी तीव्र अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले बिपरजॉय हे चक्रीवादळ आणखी तीव्र झाले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला या चक्रीवादळामुळे हवामान विभाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ १५ जूनला सौराष्ट्र-कच्छ व लगत पाकिस्तानची किनारपट्टी, तसेच या दिवशी दुपारपर्यंत मांडवी कराची ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान किनापट्टीलगत १२५-१३५ किमी प्रतितास ते १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तर हवामान विभागाकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून आज राज्यातील मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पडेल, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा तशेच कोकणातील रत्नागिरी व मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी दिसेल  असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


दुसऱ्या न्यूज पहा 

Leave a Comment