सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु। कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये – सर्व जिल्ह्यांचे अर्ज सुरु 

कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणे बाबत योजना.

Maharashtra government schemes for covid-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना/बालकांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून त्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. ज्यांचे पालक कोरोनामुळे गमावले आहेत अशा  पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातिल अर्ज आवश्यक कागदपत्र जोडून करावा, असे आवाहन महिला बालविकास विभागा कडून करण्यात आले आहे.

सर्व जिल्हे अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता – येथे अर्ज करा 👇

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सर्व तालुके किंवा तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा येथे कागदपत्रा सह अर्ज जमा करावा.

अर्जाचा नमुना 

👉 येथे पहा 

अर्थ सहाय्यासाठी म्हणजे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र लिस्ट :

  • 3 ते १८ वयोगटातील बालकांना याचा लाभ मिळणार आहे.
  • बालकाचे अथवा बालकांच्या पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार संलग्न असल्याबाबत  पासबुक झेरॉक्स प्रत लागेल 
  • आई-वडील कोविड -19 ने मुत्यृ झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत
  • बालकाचे शाळेचे बोनाफाईड
  • बालकाचे आधार कार्ड
  • शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र असे आवश्यक आहे
जळगाव जिल्हा 
जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यांनी आपले तालुक्यातील
1) तहसीलदार सर्व तालुके 
2)एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सर्व तालुके 
3)जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव पिन नं. 425001 यांच्याकडून अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव वरी दिलेल्या या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता –
अधिका माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत , दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव येथे संपर्क साधावा.

जळगाव दूरध्वनी /फोन नं. 0257-2228828

नांदेड जिल्हा 

नांदेड जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये.

१)तालुका स्तरावर गरजु लाभार्थ्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी  कार्यालय

२)तर नांदेड मनपा क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनी संरक्षण अधिकारी  कार्यालय किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून प्रस्ताव सादर करावा असे सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या योजना 

Leave a Comment