Mahaawas abhiyan Gramin 2021-22 महाआवास अभियान

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 | Mahaawas abhiyan Gramin 2021

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान – ग्रामीण 2021-22 

राज्यात २०२० मध्ये Mahaawas abhiyan 2021 राबविण्यात आले होते ते अभियान यशस्वी झाल्यामुळे सन २०२१ मध्ये हि 20 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय आवास दिना’ चे औचित्य साधून महा आवास अभियान 2021-22 राबविण्याचा निर्णय १६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत घरकुल बांधकाम जलद गतीने होण्यासाठी मदत होणार आहे. बांधकाम मध्ये होणार उशीर आणि वेळेची बचत करण्यासाठी हे महा आवास अभियान राबिविण्यात आले आहे.

दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते ०५ जून २०२१ या कालावधीत राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान-ग्रामीणमुळे विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आलेली गतीमानता व गुणवत्तावाढ विचारात घेता सन २०२१-२२ या वर्षामध्ये “महा आवास अभियान २०२१-२२” राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

सन २०२१-२२ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी मध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत -महा आवास अभियान-ग्रामीण २०२१-२२० राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 | Mahaawas abhiyan Gramin 2021

महा आवास अभियान-ग्रामीण २०२१-२२ राबविण्याचे उदिष्टे:

 • ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम (Convergence) घडवून आणणे.
 • राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जन-जागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे.
 • राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे.
 • ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटक जसे- स्वयंसेवी संस्था (लायन्स क्लब, रोटरी क्लब, इ.), सहकारी संस्था (साखर कारखाने, दुधसंघ, इ.), खासगी संस्था (Corporates), तंत्र शिक्षण संस्था (IITB, COEP, VNIT, इ.), बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इ. भागधारकांचा सक्रीय सहभाग वाढविणे.
 • ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांची गुणवत्ता वाढविणे.

महा आवास अभियानातर्गत राबविण्यात येणारे उपक्रम

 • घरकुलांना 100 टक्के मंजूरी देणे
 • पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वाटप करणे
 • ग्रामीण गवंडी प्रशिक्षण देणे
 • भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक तयार करणे ,
 • वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक,
 • वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे
 • किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान,
 • डेमो हाऊसेस
 • विविध शासकीय योजनांशी कृती संगम
 • बँकेचे कर्ज मेळावे घेणे
 • बहुमजली गृहसंकुले
 • रेन वॉटर हार्वेस्टींग
»Mahaawas abhiyan Gramin 2021-22 महाआवास अभियान GR pdf«

दुसऱ्या नवीन योजना

Leave a Comment