कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 | या जिल्ह्यात अर्ज सुरू
योजनेचे नाव | कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 |
परभणी जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख | ३० जून 2022 – अर्ज सुरु 👈👈 |
सातारा जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख | 27 जून 2022 – अर्ज सुरु 👈👈 |
कोल्हापूर जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी ते 11 मार्च २०२२ |
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख | १२ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ |
लातूर जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख | 1 फेब्रुवारी 2022 |
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सघन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे तरी या योजनेअंतर्गत सर्व सामान्य नागरिकांचा विचार करून सर्व प्रवर्गातीत लाभार्थ्यांना 50 % अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये मिळणार आहे. जे अर्जदार सद्यस्थितीत ज्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. आणि ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.
Poultry Development blocks application 2022
प्रती तालुका 1 या प्रमाणे लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने राज्यातील 302 तालुक्यामध्ये योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार. ३०२ लाभार्थी निवडणार आहेत.
सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यास्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत तसेच, ज्या लाभार्थ्यांकडे लघु अंडी उबवणुक यंत्र आहे. अशा लाभर्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
महत्वाच्या मार्गदर्शक सूचना
- लाभार्थी / अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष हवे.
- कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो पात्र अर्जदाराने स्वतः करावा लागेल.
- लाभार्थीकडे 2500 चौ.फू. जागा स्वतःच्या मालकीची असणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी वाहतुकीची, पाण्याची व विजेची सुविधा उपलब्ध पाहिजे.
- या योजनेअंतर्गत 30 टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- पात्र लाभार्थ्यास हा कुकुटपालन व्यवसाय कमीत -कमी ३ वर्ष करणे आणि असे शासनास हमीपत्र देणे बंधनकारक आहे.
⇓ सातारा जिल्हा ⇓ अर्ज सुरु |
सन 2022 – 23 करीता सातारा जिल्ह्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविण्यात येत आहे.
परसातील कुक्कुटपालन सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याच्या या योजने अंतर्गत सन 2022-2023 करिता खंडाळा, महाबळेश्वर व कराड या तालुक्यांमधून प्रति तालूका 1 लाभार्थी या प्रमाणे तीन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
satara kukutpalan anudan yojana 2022 अर्ज कोठे करायचा
या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 27 जून 2022 आहे. तरी इच्छूक लाभार्थ्यांनी पूर्ण माहिती सह अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज मिळेल ते घेऊन दि.27 जून 2022 पर्यंत सादर करावा.
⇓ परभणी जिल्हा ⇓ अर्ज सुरु |
सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मानवत व सेलू तसेच पालम तालुक्यासाठी सर्वसाधारण महिला व पुरुष एकत्रित अर्जातुन प्रति तालुका १ या प्रमाणे गट स्थापन करण्यात येणार आहे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
परभणी जिल्हा अर्ज कोठे करायचा ?
- पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे दि. ३० जुन २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत.
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती-
सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत,
- ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
- कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात.
- प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेचे कागदपत्र
- अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इ. कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाची आहेत.
- योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
- फोटो आयडी / आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ४
- कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत
⇓ कोल्हापूर जिल्हा ⇓ अर्ज तारीख संपली |
Kolhapur kukutpalan anudan yojana 2022 करवीर तालुका वगळता उर्वरित 11 तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 2021-22 या वर्षात या योजनेच्या लाभासाठी कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातून इच्छुकांकडून अर्जाची मागणी तसेच गतवर्षी उद्दिष्ट पूर्ण करू न शकलेल्या पन्हाळा व चंदगड तालुक्यातूनही अर्ज मागणी करण्यात आली आहे. इच्छुकांनी Poultry farming subsidy Kolhapur योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 मार्च २०२२ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.
Kolhapur kukutpalan anudan yojana 2022 अर्ज कोठे करायचा –
लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर करावेत.
⇓ लातूर जिल्हा ⇓ तारीख संपली |
सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर व शिरुरु अनंतपाळ या तालुक्यातून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेकरिता काम करु इच्छीणाऱ्या लाभधारकांची प्रति तालुका एक लाथार्थिची निवड करावयाची आहे.
लातूर कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 अर्ज कोठे करायचा –
लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर व शिरुर अनंपाळ तालुक्यातील सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजने करीता प्रति तालुका एक लाभार्थी निवडीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 21 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कडे सादर करावा.
👇उस्मानाबाद जिल्हा :👇 तारीख संपली |
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजने अंतर्ग जाहीर आवाहन योजना- उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापुर, कळब, उमरगा, भुम, परांडा या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना सन 2021-22 पात्र इच्छुक लाभार्थीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राधान्यक्रमाने सन 2021-22 करीता उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम,परांडा,कळंब ,तुळजापूर ,उमरगा या पाच तालुक्यांची निवड केलेली आहे. तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
Osmanabad kukutpalan anudan yojana 2022 अर्ज कोठे करायचा –
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब , तुळजापूर , उमरगा तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी त्यांचे अर्ज संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्जाची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२
सदर योजनेचे मार्गदर्शक सुचना अर्जाचा नमुना व बंधपत्राचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती तुळजापुर, कळंब, उमरगा, भुम, परांडा यांच्याकडे उपलब्ध देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या योजना
- उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२
- प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 अर्ज
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2022 अर्ज सुरू
- Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme 2022
- सोयाबीनचे भाव | soybean bazar bhav Maharashtra
- शेत रस्ते मंजूर यादी आली | मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022
- मुरघास मशीन अनुदान 2022 अर्ज सुरू | लातूर आणि परभणी जिल्ह्यासाठी
- ग्रामपंचायत योजना 2021-22 | पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी
- नाविन्यपूर्ण योजना 2021अर्ज सुरु | Navinya purna yojana
- Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana Maharashtra । असा करा ऑनलाईन अर्ज
Kukut palan
Kukat palan yojna
Shantabai vijay turukmane
Kukutpalan
जालना मध्ये आली नाही का
yenar ahe thodya divsat
Dhule jila kutkut paln yajna
Pune Jilha kukut palan yojna