हिंगोली जिल्ह्यासाठी ट्यूब वेल व पंपसेट अनुदान २०२२ अर्ज सुरु

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

हिंगोली जिल्ह्यासाठी अर्ज सुरु । Hingoli Tube well and  pump set subsidy 2022

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना tube well, pump set, well, farm pond ,solar, well, farm pond अशा विविध बाबी करिता अनुदान दिले जाते. 

यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी अर्ज सुरु झाले आहेत.असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हिंगोली ट्यूब वेल व पंपसेट अनुदान २०२२

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या शेतात ट्यूब वेल आणि  पंपसेट देण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ट्यूब वेल व पंपसेट अनुदान साठी लागणारी कागदपत्र /documents 

 • ओळखपत्र किंवा आधारकार्ड लागणार आहे.
 • तसेच या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला नसल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र द्यावे लागेल.
 • दोन पासपोर्ट साईज फोटो
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • अर्जासोबत अनुसूचित जमातीचे सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र
 • जमिनीचा सातबारा ( कमीत कमी  ६० गुंठे लागवडीलायक शेती असल्याचा पुरावा )
 • पासबूकची झेरॉक्स प्रत
 • रहिवाशी प्रमाणपत्र

अर्ज कोठे करायचा ?

 • रील सर्व कागदपत्र जोडून पूर्ण कागदपत्रासह हा विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे जमा करावयाचा आहे.
 • अर्ज नमुना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी जि.हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही घेऊ शकता.

अर्ज करायची शेवटची तारीख 

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक १३ मे २०२२ पासून  २० मे  २०२२ देण्यात आली आहे. या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वानी नोंद घ्यावी. तरी तुम्ही वेळेत अर्ज करून याचा लाभ घेऊ शकता.

दुसऱ्या नवीन योजना 

Leave a Comment