बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना : Online Application Form
योजनेचे नाव | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2021 |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली |
योजना चा उद्देश | मुलींचे आर्थिक आणि शैक्षणिक जीवनमान सुधारणे व जगण्याची प्रेरणा देणे . हा मुख्य उद्देश आहे. |
कधी सुरु झाली | 22 जानेवारी 2015 रोजी |
आधिकारिक वेबसाइट – बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2021 Online Form
देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून बेटी बचाओ बेटी पढाओ योजना नावाच्या अशाच एका योजनेशी संबंधित माहिती सांगणार आहोत.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली . देशातील मुलीची कमी होत असलेली संख्या लक्षात घेऊन या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.
मुलीच्या बँक खात्यात दरमहा १००० रुपये जमा केल्यावर मुलीला काय लाभ मिळेल
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०२१ च्या अंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलीच्या बँक खात्यात दरमहा १००० रुपये म्हणजे १२००० रुपये प्रति वर्षे जमा केले तर तुम्ही १४ वर्षात एकूण १,68००० रुपये जमा कराल. 21 वर्षानंतर बँक खाते परिपक्व झाल्यानंतर आपल्या मुलीला 6, 07, 128 रुपयांची रक्कम मिळेल . जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल, तेव्हा आपण 50% पैसे काढू शकता आणि राहिलेली उर्वरित 50% पैसे देखील मुलीच्या लग्नाच्या वेळी काढू शकता.
Beti Bachao Beti Padhao Scheme चे documents
- आधार कार्ड
- आई वडिलांचे ओळख पत्र
- मुलीचे जन्म प्रमाण पत्र
- मोबाइल नंबर
- रहिवासी पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनेची पात्रता
- मुलगी भारताची स्थाई रहिवासी असायला पाहिजे .
- मुलीच्या नावावर एक सुकन्या समृद्धि अकाउंट पाहिजे.
- या योजनेनुसार अर्जदार मुलीचे वय 10 वर्ष पाहिजे .
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनेचे उद्देश्य
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनामुळे लिंग गुणोत्तर समान करणे.
- योजनेच्या मदतीने भ्रूणहत्या रोखणे.
- आजही मुलींना एक ओझे समजले जाते हा विचार समाजातून काढून टाकणे.
- मुलींना प्रत्येक क्षेत्रात समान हक्क आणि सामाजिक दर्जा प्राप्त करून देणे.
- समाजात जागरूकता करून या योजनेअंतर्गत भ्रूणहत्या रोखणे व मुलगा हा वंशाचा दिवा असतो असे विचार बदलणे.
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनाचे लाभ
- या योजनेचा मुलींना शिक्षण आणि सामाजिक संरक्षण मध्ये लाभ होईल.
- योजनेच्या मदतीने भ्रूणहत्या थांबतील व मुलींना सुरक्षा प्रदान होईल.
- या योजने अंतर्गत मुलींना शिक्षण आणि त्यांच्या लग्नासाठी आर्थिक लाभ मिळेल. या लाभामुळे लोक मुलींना शिकवतील व मुलींची प्रगती होईल.
- मुलगा आणि मुलगी असा जो समाजात भेदभाव आहे तो कमी होईल आणि दोघांना समान जीवन मिळेल .
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ऑफलाईन फॉर्म प्रक्रिया
- सगळ्यात अगोदर आपणाला जवळच्या बैंक मध्ये नाहीतर पोस्ट ऑफिस मध्ये आपले सगळे कागदपत्र घेऊन जावे लागेल.
- त्यानंतर या योजने साठी अकाउंट उघडावे लागेल, त्याचसाठी फॉर्म घेऊन त्यात तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल .
- सर्व माहिती भरून त्या फॉर्म सोबत तुमचे सर्व कागदपत्र जोडून तो फॉर्म बँक नाहीतर पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल .
- अशा प्रकारे आपण फॉर्म जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता .
article on beti bachao beti padhao
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .