या बँकेने महिलांसाठी लाँच केली नवीन सेव्हिंग स्कीम । bank launch saving scheme for ladies 2023

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

या बँकेने महिलांसाठी लाँच केली नवीन सेव्हिंग स्कीम । bank launch saving scheme for ladies 2023

banks  Mahila Samman Savings scheme : ही सरकारी योजना महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली असून या योजनेचे काय फायदे आहेत, तसेच या योजेसाठी कोण अर्ज करू शकते हे आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदा ही योजना लाँच करणारी देशातील तिसरी बँक ठरली आहे, या अगोदर कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी ही योजना लाँच केली होती.

महिलांसाठी सेव्हिंग स्कीम चे फायदा काय आहे ?

या योजनेमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात (MSSC) दोन वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार असून . यामध्ये,  महिला जे पैसे या योजनेमध्ये बँकेत जमा करतील त्यावर  वार्षिक आधारावर  ७.५ टक्के दरानं व्याज देणार असून. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.

कोण करू शकतं अर्ज?

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना आणि बँकेचे ग्राहक नसलेल्या महिलांनाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खाते उघडण्याची परवानगी देत आहे . यामध्ये महिला स्वतःच्या वतीने किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीनं खातं उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महिलांसाठी सेव्हिंग स्कीम चे नियम  काय आहेत ?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं आणि जर खातेदारास  गंभीर आजार वगैरे असल्यास खातं वेळेपूर्वी बंद करण्याची सुविधा आहे. खाते लवकर बंद झाल्यास, योजनेच्या ७.५ टक्के मानक दरानं मूळ रकमेवर व्याज मिळेल .

 

किती आकारतात दंड?
महिला सन्मान बचत योजनेचे खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर, ग्राहक २ टक्के दंड भरून खातं बंद करण्याची विनंती करू शकतात. अशा परिस्थितीत, मूळ रकमेवर ५.५ टक्के व्याज दिलं जाईल. त्याच वेळी, MSSC योजनेच्या खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, खातेधारक पात्र शिल्लक रकमेच्या ४० टक्क्यांपर्यंत अंशतः पैसे काढू शकतात.


 

Leave a Comment