९०% अनुदानावर स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर,बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

९०% अनुदानावर सोयाबीन सेपरेटर, बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत बीबीएफ/स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर व स्थानिक भाजीपाल किट या घटकांचा लाभ घेणेकरीताच्या  उस्मानाबाद अर्ज मागविले आहेत .

 1. ९०% अनुदानावर ग्रेव्हीटी सेपरेटर, 
 2. ६०% अनुदानावर बीबीएफ यंत्र,
 3. १००% अनुदानावर भाजीपाला किट, देण्यात येणार आहे.

लागणारी कागदपत्र :

 • 7/12
 • ८ अ
 • कागदपत्र
 • विहित अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे जमा करायचा आहे .
 • आधार कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • महिला बचत गट / शेतकरी गट /शेतकरी उत्पादक कंपनी यांचे नोंदणी प्रमाण पत्र.

1.९०% अनुदानावर ग्रेव्हीटी सेपरेटर :

 • महिला बचत गट,शेतकरी गट यांना व वैयक्तीक शेतकरी यांना स्पायरल ग्रेव्हीटी सेप्रेटर प्राधान्य देण्यात येईल.
 • लाभार्थींचे विहित अर्जामधील सर्व माहिती बरोबर भरून तो अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालय कडे जमा करावा करावेत.
 • लाभार्थी शेतकरी 1 ते 2 हेक्टर व इतर 2 हेक्टर पेक्षा जास्त अशा शेतकऱ्यांना यामध्येही अनुसुचित जाती,जमाती व महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार येईल.
 • स्पायरल ग्रेव्हीटी सेप्रेटर 90 टक्के अनुदानावर रक्कम रु.10000 च्या प्रति घटक मर्यादेत देण्यात येणार आहे.

2. ६०% अनुदानावर बीबीएफ यंत्र :

 • BBF हे वैयक्तीक शेतकरी,शेतकरी गट व FPO (शेतकरी उत्पादक कंपनी) यांना देण्यात येणार आहे.
 • BBF 60 टक्के अनुदानावर रक्कम रु.35000 च्या प्रति घटक मर्यादेत मिळेल.
 • पात्र लाभार्थींना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर जमा करण्यात येईल.
 • विहित अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे जमा करावेत.

3. १००% अनुदानावर भाजीपाला किट :

 • स्थानिक बियाणे किट हे मान्यता प्राप्त संस्था यांच्याकडुन घेणे बंधनकारक आहे.
 • किट मध्ये 30 ते 35 भाजीपाला बियाण्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
 • निक बियाणे हे महिला बचत गट व वैयक्तीक शेतकरी यांना देण्यात येतील.
 • भाजीपाला किट 100 टक्के अनुदानावर रक्कम रु.1000 च्या प्रति घटक मर्यादेत मिळेल.
 • लाभार्थ्यांना अनुदान डी.बी.टी पध्द्तीने त्यांच्या बँक खातेवर जमा करण्यात येईल.

 

⇒ अर्ज pdf – स्पायरल ग्रॅव्हिटी सेपरेटर आणि बीबीएफ यंत्र

⇒अर्ज pdf -स्थानिक भाजीपाला बियाणे किट


Contact Details : 

अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद फोन – 02472-227118 सपंर्क करावा तसेच संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे संपर्क करावा.


नवीन योजना

Leave a Comment