शबरी घरकुल योजना 2021-22 | shabari gharkul yojana 2021
योजनाचे नाव | शबरी घरकुल योजना 2021 | shabari awas gharkul yojana 2021 |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनाचा उद्देश | राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देणे. |
शबरी घरकुल योजना २०२१ आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची shabari awas gharkul yojana 2021 राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.
आदिवासी घरकुल योजना 2021 उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्हयांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाहय क्षेत्रात येणाऱ्या जिल्हयांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करुन देण्यात येईल
शबरी घरकुल योजनेच्या अटी
- माजिक आर्थिक जात जनगणना २०११ नुसार प्राथम्य यादीतील (Priority List) लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास- ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. वगळण्याच्या निकषानुसार (Exclusion Criteria) प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मधून वगळलेल्या परंतु संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादेत आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
- संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देताना दिनांक २८.०३.२०१३ व दि.५.१.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमाती व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल .
- शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात येईल. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येईल .
- संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात येईल .
shabari awas yojana list 2021 maharashtra – शबरी घरकुल योजना यादी 2021
शबरी आवास योजना 2021 लाभ
- कच्चे घर असणाऱ्या कुटुबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक साहाय्य.
- मनरेगा माध्यामातुन लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार उपलब्ध.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक तरतुद
- घर बांधकामसाठी 1,20,000/-रु इतकी तरतूद
अर्ज येथे जमा करायचा – ग्रामसेवक यांच्या कडे जमा करायचा संबंधित प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे :
- दारीद्रय रेषेखालील प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- दोन पासपोर्टसाईज फोटो
- सातबारा उतारा व नमुना-८-अ शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा) शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे १० ग्रामसभेचा ठराव
शबरी घरकुल योजना योजना पात्रता :
- लाभार्थीकडे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
- वार्षिक उत्पन हे ग्रामीण भागासाठी 1 लाख व नगरपरिषदसाठी 3 लाख आणि महानगरपालिका 3 लाख असे प्रत्येक भागातील लोंकाना उत्पन्नाची मर्यादा असेल.
- लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी .
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातीलअनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
- लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे .
- विधवा, परित्यक्त्या, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
नवीन योजना
- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना 2021-22 असा करा ऑनलाईन अर्ज
- Mahaawas abhiyan Gramin 2021-22 महाआवास अभियान
- महाराष्ट्र विवाह नोंदणी फॉर्म 2021 PDF | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत
- E Shram UAN Card Maharashtra Registration 2021 | ऑनलाईन नोंदणी
- आईटीआई शिष्यवृत्ती योजना | ITI Scholarship 2021 Form | फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
- कृषि यांत्रिकीकरण योजना 2021-22 Online Registration
- महाराष्ट्र EV सबसिडी धोरण 2021 Online नोंदणी | Maharashtra EV Subsidy policy 2021 registration
- कुसुम सोलर योजनेच्या घटक अ करिता नोंदणी सुरू || kusum solar yojana part A Online Form
- Pradhan Mantri Daksh Yojana | PM Daksh Yojana Registration 2021 Online
- उद्योग आधार रजिस्ट्रेशन ऑनलाइन | आधार उद्योग
- शेळी पालन अनुदान योजना 2021 | Sheli palan yojana
- कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021-22| Kusum Solar Pump Online form
- ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 महाराष्ट्र Online form
- Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजनेत महत्वाचा बदल
माझं नाव भगवान विजय कोडी आहे आमच्या गावाचे सरपंच किरण नन्नवरे गावाचं नाव कडोली तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या गावात आम्ही बऱ्याच वर्षापासून पण आमची स्वतःची जमीन असल्याने आम्हाला शबरी आवास योजना लाभार्थी नाही मिळत असे त्यांचे म्हणणे आहे ते आम्हाला घरकुल देऊ शकत नाही