महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022-MJPJAY
योजना का नाम | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 |
किसने शुरू की | महाराष्ट्र स्वास्थ्य मंत्रालय |
इसका उद्देश | राज्यातील जनतेलागंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे. |
राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा पहिला टप्पा दिनांक २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती नांदेड, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोलापूर,धुळे,रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.
तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर काही अडचण आल्यास हा GR शासन निर्णय तुम्ही हॉस्पिटल ला दाखवू शकता व उपचार घेऊ शकता .
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
२६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णय नुसार आयुष्मान सदर योजना ह्या पूर्णपणे निशुल्क (cashless) असून योजनेतून पात्र लाभार्थ्यांना अंगीकृत रुग्णालयांमध्ये पूर्णतः मोफत उपचार पुरविले जातात .
वेबसाइट – https://www.jeevandayee.gov.in/
या योजनेचे लाभ
- प्रति कुटुंब प्रति वर्षी रु १. ५ लाख रुपयापर्यंत मेडिकल व सर्जिकल उपचार व किडनी प्रत्यारोपणासाठी रु . २. ५ लाख रुपयापर्यंत उपचार दिला जातो.
- तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु . ५ लाख रुपयापर्यंत उपचारांचा लाभ अनुदेय आहे .
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उद्देश्य :
- राज्यातील जनतेलागंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे.
योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये:
या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना आधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. सध्या योजनेमध्ये खाजगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये अंगीकृत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 Documents :
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- उत्पन प्रमाण पत्र
- बीमारी का सर्टिफिकेट जो सरकारी डॉक्टर ने दिया होना चाहिए |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता :
- अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे.
- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
- औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी । महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf
- त्वच्याप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- पॉलिट्रामा
- प्रोस्थेसिस
- जोखिमी देखभाल
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- हृदयरोग
- नेफ्रोलोजी
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
- अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
- पोट व जठार शस्त्रक्रिया
- कार्डीओव्हस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतूविकृती शास्त्र
- कर्करोग शस्त्रक्रिया
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- रेडीओथेरेपी कर्करोग
- रोमेटोलोजी
- इंडोक्रायनोलोजी
- मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
- इंटरवेन्शनल रेडिओलोजी
- या आरोग्य योजनेमध्ये या आजारांचा उपचार केला जातो.
महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर
तक्रार निवारण –१५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात.
https://www.jeevandayee.gov.in/ – ऑफिसियल वेबसाइट
नवीन योजना
- बिनव्याजी पीककर्ज योजना | पंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना 2022
- कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | Kusum Solar Pump Online form
- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 महाराष्ट्र Online form
- Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजनेत महत्वाचा बदल
सर्वं सामान्य लोकांना काही उपयोय होत नाही बरेच असे आजार यामध्ये बसत नाही
बरोबर आहे!