भारत सरकार शिष्यवृत्ती योजना 2021 | Online Form

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना | Online Form

योजनेचे नाव भारत सरकार शिष्यवृत्ती योजना 2021
कोणी सुरु केली केंद्र सरकारने सुरु केली
योजना चा उद्देश सफाईकामगार , कचरा गोळा करणारे कामगार अशा काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे .
कधी सुरु झाली 2017-2018 मध्ये
Online Form ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 2 .4 .2018 च्या पत्रान्वये विहित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची सन 2021 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
 साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना pre metric scholarship yojana अंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 2.4. 2018 च्या पत्रान्वये विहित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना तसेच योजनेची नियमावली परिशिष्ट सोबत जोडली आहे.
ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेसाठी केंद्र शासनाकडून राज्याच्या बांधील खर्चापेक्षा जास्त होणाऱ्या योजनेवरील खर्चाची शंभर टक्के रक्कम केंद्रीय सहाय्य म्हणून केंद्र शासनाकडून राज्य प्राप्त होईल.

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2021 – अटी व शर्ती

  • सदरील शिष्यवृत्तीचे कालावधीत विद्यार्थ्यांना रोजगार करता येणार नाही अथवा विद्यार्थ्यांना पालकांच्या कामात मदत करता येणार नाही.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  शाळेच्या मुख्याध्यापकांनी अपवादात्मक परिस्थितीबाबत प्रमाणित केले पुढील इति येथे प्रवेश मिळत नसल्या शिष्यवृत्ती खंडित करण्यात येईल.
  • सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड असणे बाबत पुरावा सादर करावा लागेल किंवा आधार अधिकृत करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आधार कार्ड साठी नोंदणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल.
  • विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास किंवा शिष्यवृत्ती योजनेचे अटी व शर्ती चे उल्लंघन केल्याचे शाळा व्यवस्थापनाचे मत झाल्यास सदरील योजनेचा लाभ संपुष्टात आणण्यात येईल अथवा लाभ रद्द करण्यात येईल.

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना योजनेचा उद्देश्य

सदर योजनेचा उद्देश हा खालील व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक साहाय्य देणे हा आहे.

  • हाताने मेहतर काम करणाऱ्या मानवी विष्टांचे वहन करणाऱ्या व्यक्ती किंवा बंदिस्त उघड्या गटारांची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती.
  • अस्वच्छ व्यवसायाची संबंध परंपरेने असलेले सफाई कामगार.
  • कातडी कमावणारे आणि कातडी सोडणारे कामगार.
  • कचरा गोळा करणारे उचलणारेकामगार.
  • मॅन्यूअल सव्हेंजर्स 2013 मधील सेक्शन 2 I d नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणारे पालक.

अभ्यासक्रमाचा कालावधी आणि अभ्यासाचा कोर्स

  • इयत्ता १ ली किंवा त्यापुढील कोणत्याही इयतेत किंवा प्री मॅट्रिक स्तरावर प्रवेशित अनिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळेल .
  • त्याच बरोबर इयता १ ली साठी किंवा त्यापुढील येतील किंवा प्री मॅट्रिक स्तरावर प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना सदरील योजना लागू राहील.
  • सदरील योजनेचा लाभ हा इयत्ता दहावी पर्यंत घेता येईल.
  • एका शैक्षणिक वर्षात १० महिन्यांच्या कालावधीसाठी शिष्यवृत्ती मिळेल.
  • राज्य शासनामार्फत मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी सदरील योजनेच्या लाभासाठी पात्र असतील.

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना – पात्रता

खालील व्यवसायात काम करणाऱ्या पालकांची मुली/मुले हे सदरील योजना यासाठी पात्र असतील.

  • हाताने मेहतर काम करणाऱ्या मानवी विष्टांचे वहन करणाऱ्या व्यक्ती किंवा बंदिस्त उघड्या गटारांची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती
  • सदर योजनेचा उद्देश हा खालील व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे.
  • अस्वच्छ व्यवसायाची संबंध परंपरेने असलेले सफाई कामगार.
  • कातडी कमावणारे आणि कातडी सोडणारे कामगार.
  • कचरा गोळा करणारे उचलणारे कामगार.

अगोदर किती शिष्यवृती मिळायची – जुने दर

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना | Online Form

आता किती शिष्यवृती मिळणार आहे – नवीन दर

भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना | Online Form
भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना नवीन दर

या योजनेचा लाभ घायचा असल्यास अशा अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांनी खालील अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे

  • ग्रामपंचायत – क्षेत्र ग्रामसेवक व सरपंच
  • नगरपालिका – क्षेत्र मुख्याधिकारी
  • महानगरपालिका क्षेत्र – आयुक्त / उपायुक्त
अर्ज करण्याची पद्धती – आत्मनिर्भर भारत योजना मराठी pdf
येथे क्लिक करून Official Website तुम्ही फॉर्म भरू शकता 
  • ऑनलाईन अर्ज बरोबर सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
  • तसेच ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक असेल . राज्य शासन NSKFDC यांच्याशी समन्वय ठेवतील.

भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म


अशाच नवीन – नवीन सरकारी योजनासाठी आमच्या Telegram ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा

Telegram Group – Join

Leave a Comment