फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 | Free Tablet Yojana 2021 Mahajyoti Registration

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र ही योजना महाज्योती या संस्थे मार्फत राबिविण्यात येत आहे. महाज्योती या संस्थेला महाराष्ट्र सरकार चा पाठिंबा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकाने महाज्योती संस्थे सोबत मिळून १० वी पास विध्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची मोहीम हाती घेतली आहे.

२०२१ मध्ये ज्यांची १० पास झाली आहे आणि ज्यांनी ११ वी science ला ऍडमिशन घेतले आहे अशा विध्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल .या योजने अंतर्गत विध्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे आणि तसेच रोज ६ GB इंटरनेट आणि सोबत काही पुस्तके पण देण्यात येणार आहेत.

१० वी पास विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन क्लासेस देऊन त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला यो योजनेची पात्रता , लाभ , कागदपत्रे व Free Tablet Yojana 2021 Mahajyoti Registration ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे हे सांगणार आहोत.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021- 22पात्रता

  • तुम्ही १० पास असायला पाहिजे आणि १० नंतर तुम्ही ११ वी science ला ऍडमिशन घेतलेले असावे.
  • शहरी भागातील विध्यार्थ्यांना १० वी ला ७० % पेक्षा जास्त गुण असायला पाहिजेत.
  • ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना १० वी ला ६० % पेक्षा जास्त गुण पाहिजेत.

या योजनेसाठी कोणत्या कास्ट चे विध्यार्थी अर्ज करू शकतात

  • OBC
  • VJNT
  • SBC

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021-22 योजनेचे लाभ

  • नवीन टॅबलेट + ६ GB इंटरनेट per day फ्री
  • ऑनलाईन coaching क्लासेस फ्री मिळणार आहेत.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021-2022 योजनेची documents / कागदपत्रे
  • फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र २०२१ योजनेची documents / कागदपत्रे
  • १० वी ची मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • कास्ट सर्टिफिकेट
  • Non-Creamy Layer Certificate
  • ११ वी science ऍडमिशन पावती किंवा पुरावा
  • पासपोर्ट size फोटो
  • मोबाईल नंबर
  • signature / तुमची सही
  • ई-मेल id
Free Tablet Yojana 2022 Mahajyoti Registration : असा भरा ऑनलाईन फॉर्म

Step 1 : सर्व प्रथम तुम्हाला mahajyoti.org.in या ऑफिसिअल वेबसाइट वर जावे लागेल. या पेज वर तुम्हाला खाली upcoming Events च्या खाली MH-CET /JEE/NEET नोंदणी खाली read more बटण वर क्लिक करा. 

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

 

Step 2 : पुढे एक पेज उघडेल त्यावर click here For registration या ऑपशन वर क्लिक करावे लागेल. 

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

Step 3 : क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉरमेशन भरावी लागेल. जसे कि तुमचा फोटो अपलोड करावा लागेल (२०० KB च्या मधला ) , सही , शाळा सोडल्याचा दाखला , कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी , बोनाफाईट / मार्कशीट सगळी माहिती भरल्या नंतर अपलोड या ऑपशन वर क्लिक करा.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

Step 4 : अपलोड या ऑपशन वर क्लिक केल्या नंतर फॉर्म वरती तुम्हाला तुमचा फोटो आणि सही दिसेल आता तुम्हाला इथे अँप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे.

  • सर्व प्रथम तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे ते निवडा , पुढे तुमचे पूर्ण नाव , जन्म तारीख , gender , आधार नंबर , state , category , cast , Non-Creamy Layer Certificate, पत्ता ग्रामीण का शहरी ते सिलेक्ट करा .

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

  • पुढे Contact Details साठी मोबाईल नंबर , ई-मेल, parmenant address , ही माहिती भरा .

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

  • पुढे तुम्हाला Parents Details टाकायचे आहे त्यामध्ये , name , relation , ई-मेल इत्यादी माहिती भरावी लागेल.नंतर Qualification details टाकावी लागेल.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

  • इथे candidate चे Qualification Details भरा.
  • education, medium, board, percentage टाकते वेळेस ७५,८०,७२ असे टाका पॉईंट टाकू नका, name of the school, address of school, area of the school हे सर्व माहिती भरा.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

  • पूर्ण फॉर्म भरून झाल्या नंतर Submit या बटण वर क्लिक करा.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म

  • पुढे तुमचा फॉर्म उघडेल त्याखाली प्रिंट च्या ऑपशन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्म ची प्रिंट घेऊ शकता.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला महाज्योती या संस्थे तर्फे संपर्क करण्यात येईल. अशा प्रकारे तुम्ही Free Tablet Yojana 2021 Mahajyoti Registration : ऑनलाईन फॉर्म भरू शकता. माहिती आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या फ्रेंड्स ला share करा. आणि या योजनेचा लाभ घ्या. 

Helpline / Contact Us
अधिक माहिती साठी तुम्ही Enquiry Form भरू शकता –

Enquiry FORM Link

 


दुसऱ्या योजना पहा 

2 thoughts on “फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 | असा भरा ऑनलाईन फॉर्म”

Leave a Comment