प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020 Offline Form Start
योजना चे नाव | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020 |
कोन सुरु केली | महाराष्ट्र केंद्र सरकार |
योजना चा उद्देश | मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये मत्स्य उत्पादन दुप्पट करणे व मत्स्य कामगारांना आर्थिक मजबूत करणे . |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑफलाईन पद्धतीने |
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020
प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेची सुरुवात १० सप्टेंबर २०२० रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे . या योजने अंर्तगत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधी योजना राबिवण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे . केंद्र सरकार कडून २०१८ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना राबविण्याचे घोषित केले होते. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ५ वर्षासाठी ७५२२ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे .
भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये मत्स्य उत्पादन दुप्पट करण्यासाठी या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे . २० मे २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता मिळाली , आणि १० सप्टेंबर २०२० रोजी या योजनेचा प्रारंभ झाला आहे . या योजनेसाठी एकूण बजेट २०,०५० कोटी नेमले आहे यात केंद्र शासनाचे ९,०४०७ कोटी रुपये तर राज्य सरकारचे ४,८८० कोटी रुपये आणि बाकी ५,७६३ कोटी रुपये हे लाभार्त्यांचे असणार आहेत .
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी
- मत्स्य कामगार आणि मत्स्य विक्रेते
- मत्स्यपालन विकास महामंडळ
- मत्स्यपालक
- बचत गट
- खाजगी कंपन्या
- अनुसूचित जाती , महिला
- मत्स्यपालन सहकारी संस्था
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्देश
- उत्पादन आणि उत्पादकता क्षमतेमध्ये वाढ.
- हंगामानंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांचा विकास.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना निधी वाटप
- संपूर्ण प्रकल्पासाठी लागणार निधी केंद्रसरकार देणार आहे .
- मत्स्यव्यवसाय विकास मंडळासह केंद्रसरकारकडून सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना पूर्ण खर्चाच्या ४० % अनुदान सरकार देणार आहे, तसेच अनुसूचित जाती-जमाती, महिला याना पूर्ण खर्चाच्या ६०% अनुदान केंद्रसरकार देणार आहे .
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे आणि हेतू
- पायाभूत सुविधांची निर्मिती करून आधुनिकीकरणा बरोबरच मूल्य शृंखला मजबूत करणे .
- मत्स्यव्यवसाय क्षेत्राकडे लक्ष देऊन २०२४-२५ पर्यंत २२ दशलक्ष मेट्रिक टन मासेमारीचे लक्ष गाठण्यासाठी दर मासेमारी वृद्धीदरामध्ये ९% उत्पादन वाढवणे हा या योजनेचा हेतू आहे.
- २०२४ पर्यंत मत्स्याकामगाराच्या उत्पादनामध्ये दुपटीने वाढ करणे हा या योजनेचा हेतू आहे.
- मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील गंभीर नुकसान व कमी उत्पादन लक्षात घेऊन हे उत्पादन वाढवण्याचा हेतू आहे याचा फायदा मत्स्याकामगारांना होईल.