पॉवर टिलर अनुदान योजना 2021 Online Registration | ऑनलाईन अर्ज असा करा
योजनाचे नाव | पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 |
ऑफिसिअल वेबसाईट | पहा |
कृषीयांत्रिकीकरण योजने मधेच हे पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 या यंत्रासाठी अनुदान दिले जाते . कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य धोरण आहे. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये जागरूकता व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
8 BHP पेक्षा जास्त पॉवर टिलर साठी अनुदान
- SC /ST च्या लाभार्थ्यांना ८५ हजार पर्यंत अनुदान मिळते. ते अनुदान ५०% च्या मर्यादेत दिले जाते .
- तसेच general Category मधील लाभार्थ्यांना ६५ हजार पर्यंत अनुदान मिळते.
8BHP पेक्षा कमी च्या पॉवर टिलर साठी अनुदान
- SC /ST च्या लाभार्थ्यांना ७० हजार अनुदान दिले जाते.
- आणि General Category च्या लाभार्थ्यांना ५० हजार अनुदान दिले जाते.
पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 पात्रता
- अर्जदार हा शेतकरी असावा
- अर्जदाराच्या नावावर कमीत – कमी १ एकर जमीन असली पाहिजे.
- सोबत ८अ आणि ७/१२ पाहिजे.
- जर तुम्ही एका यंत्राचा लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्षे तुम्हाला त्या यंत्राचा लाभ मिळणार नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या यंत्रासाठी अर्ज करू शकता.
पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- आधार कार्ड
- खरेदी करनेवाले अवजार का कोटेशन और केंद्र सरकार मान्य तपासणी अहवाल सर्टिफिकेट
- जाती प्रमाणपत्र
- समती प्रमाण पत्र
- स्वय घोषणा प्रमाण पत्र
Power tiller subsidy in maharashtra 2021 Online Application
1.सर्व प्रथम आपणास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण च्या अधिकारीक वेबसाईट वर जावे लागेल .
2. आता तुम्हाला तुमचा user name आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.. जर तुम्ही नवीन user असाल तर अगोदर नवीन रजिस्ट्रेशन नोंद करावी लागेल मग तुम्हाला user name आणि पासवर्ड मिळेल .
3. मुख्य पेज ला क्लिक केल्या नंतर आपल्याला ऑपशन दाखवले जाते अर्ज सादर करा याला क्लिक करा.
4. अर्ज सादर करा याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ७ बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत . कृषीयांत्रिकीकरण या ऑपशन पुढे या ऑपशन वर क्लिक करा.
5. पुढे अर्ज सादर करा या ऑपशन वर क्लिक करा ,पुढच्या उघडलेल्या फॉर्म मध्ये आपला वयक्तिक तपशील भरावा लागेल जसे कि तालुका , मुख्य घटक , तपशील मध्ये पॉवर टिलर निवडा , एच पी श्रेणी मध्ये ८ HP निवडा ,गाव , शहर , व्हील ड्राईव्ह प्रकार , प्रकल्प खर्च श्रेणी , मशीन चा प्रकार इ . माहिती भरावी लागेल. तालुका सेलेक्ट केल्या नंतर पुढे गाव आपोआप येईल . तपशील मध्ये तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते ऑपशन तुम्ही सिलेक्ट करा.आम्ही फक्त माहिती साठी हे ऑपशन भरले आहेत . शेवटी सगळे माहिती भरून जतन बटन वर क्लिक करा .
6.जतन केल्या नंतर आपणाला success झालेला नोटिफिकेशन दाखवला जातो .
7. त्यानंतर आपल्याला खाली आपण निवडलेल्या बाबी दाखवल्या जातील . आपल्याला जर खालील बाबी मध्ये बदल करायचा असेल तर बदलू शकतो .
8. डाव्या बाजूला असलेल्या मुख्य पृष्ठ या ऑपशन वर क्लिक केल्यानंतर आपणाला अर्ज सादर करा नावाचे ऑपशन दाखवले जाते. त्या ऑपशन ला क्लिक करायचे आहे , क्लिक केल्या नंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल . एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही , बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागेल .
9. हे नोटिफिकेशन पहिल्या नंतर आपल्याला खाली पहा नावाचे ऑपशन दाखवले जाते . त्यावर क्लिक करा . क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी आपल्यला दिसतील आता त्या बाबीना प्राधान्य क्रम द्यायचा आहे . १,२,३,४ अशा प्रकारे क्रम द्यायचे आहे .
- क्रम निवडल्या नंतर आपल्याला स्वयं घोषणा पत्र ला क्लिक करायचे आहे नंतर अर्ज सादर करा वर क्लिक करायचे आहे .
10. क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवले जाईल . इथे आपण payment करू शकता . payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता .
दुसऱ्या नवीन योजना
- वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | असा करा ऑनलाईन अर्ज
- कृषि यांत्रिकीकरण योजना 2021 Online Registration
- महाराष्ट्र EV सबसिडी धोरण 2021 Online नोंदणी | Maharashtra EV Subsidy policy 2021 registration
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- उद्योग आधार रजिस्ट्रेशन ऑनलाइन | आधार उद्योग
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2021 | मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना
- pm daksh yojana registration | pm daksh yojana 2021
Mi ganesh hindurav kamble magi 2 ekar seti ahe
ho bhetu shakel form bhara
Mi Ajay devrao Kolhe magi 3 ekar seti ahe