डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | वीज जोडणी

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी ऑनलाईन अर्ज सुरु 

या योजने अंतर्गत अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना फ्री वीज कनेक्शन मिळणार आहे.

योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
कोणी सुरु केली राज्य सरकारने सुरु केली
योजना चा उद्देश अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय करणे हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली १४ एप्रिल २०२१
योजनेचा कालावधी दि.१४ एप्रिल २०२१ 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची १३० वी जयंती जग भरात दि.१४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्यात येते . या जयंती निमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने जीवन प्रकाश योजना वीज जोडणी विशेष मोहिम दि.१४ एप्रिल २०२१ ते दि.६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठयासंबधी असणा-या तक्रारी/ समस्यांचे निवारण या योजनेमध्ये करण्यात येणार आहे.

जीवन प्रकाश योजनेची पात्रता आणि कागदपत्र काय आहे ? 

 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • लाभार्थी अर्जदाराकडे जाती प्रमाणपत्र असायला पाहिजे .
 • अर्जदाराची यापूर्वीची महावितरण थकबाकी नसावी.

जीवन प्रकाश योजना योजनेची कार्यपध्दती

 • लाभार्थ्याने रू.५००/- इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागेल.
 • सदर रतकम 5 समान मावसक हफ्त्यांमध्येच भरण्याची सुववधा असेल.
 • लाभार्थी अर्जदाराला महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करता येईल.
 • अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडावा लागेल.
 • अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या या संदर्भातील अस्तित्वात असणा-या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
 • महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
 • तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपयोजना सहीत) अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधी मधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

जीवन प्रकाश योजना ऑनलाईन फॉर्म 

Jeevan Prakash Yojana Online Registration 2021 –  येथे क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | वीज जोडणी


भरलेल्या फॉर्म चे स्टेटस चेक करा चेक स्टेटस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | वीज जोडणी


संबंधित दुसऱ्या योजना – नक्की वाचा


अशाच नवीन – नवीन सरकारी योजनासाठी आमच्या Telegram ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा

Telegram Group – Join

Leave a Comment