गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-22 अर्ज
Gopinath Munde shetkari apghat vima yojana,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कागदपत्र,
योजनाचे नाव | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१-२२ |
किती दिवसात नोंद करू शकता | अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे गरजेचे आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजना कधी सुरु झाली | २००५ |
Gopinath Munde shetkari apghat vima yojana जी पूर्वी शेतकरी जनता अपघात विमा योजना या नावाने राबवली जात होती. आता त्या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हे नाव देण्यात आले आहे. ही योजना २००५ पासून चालू करण्यात आली आहे.
२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा निश्चित केला गेला होता मात्र ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि विमा रक्कम वाढवून २ लाख करण्यात आली आहे.
सर्व शेतकऱ्यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु) शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची गरज नाही.
यापुर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा ७/१२ असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये आता बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्याला मिळणार आहे. शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात जसे कि,
- अंगावर वीज पडून मृत्यू येणे
- नैसर्गिक आपत्ती
- पूर
- सर्पदंश
- विंचूदंश
- वाहन अपघात
- रस्त्यावरील अपघात
- विजेचा शॉक लागून मृत्यू
- अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. अशा कुटुंबाना या योजनेअंर्तगत विमा स्वरूपात आर्थिक मदत मिळते. ही मदत २ लाख रुपये पर्यंत मिळू शकते. अपघात कशा मुळे आणि कोणत्या स्वरूपाचा असेल यानुसार विमा रक्कम मंजूर होते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१-२२ लागणारी आवश्यक कागदपत्र
- दावा अर्ज
- ७/१२
- दोषारोप
- ६क
- ६ड(फेरफार)
- एफ. आय. आर.
- घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
- घटनास्थळ पंचनामा
- पंचनामा
- पोष्ट मार्टेम रिपोर्ट
- व्हिसेरा रिपोर्ट
- वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
- तालुका कृषि अधिकार पत्र
- अकस्मात मृत्यूची खबर
- इंनक्वेस्ट पंचनामा
- वाहन चालविण्याचा वैध परवाना
- अपंगत्वाचा दाखला व फोटो
- औषधोपचाराचे कागदपत्र
अर्ज कुठे करावा लागेल |
जर तुमच्या कुंटुंबात जर असा अपघात झाला असेल तर तुम्हाला वरी दिलेले अर्ज डाउनलोड करून तो अर्ज भरून या कागदपत्रा सह तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कडे जमा करावा लागेल.
-
विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
-
शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
-
मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
दुसऱ्या योजना
- रमाई आवास घरकुल योजना 2021 pdf download
- नाविन्यपूर्ण योजना 2021अर्ज सुरु | Navinya purna yojana
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म
- रमाई आवास घरकुल योजना 2021 pdf download
- pm kisan samman nidhi yojana status check