आत्मनिर्भर भारत योजना Online Form
योजना चे नाव | आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2020 |
कोणी सुरु केली | राज्य सरकार |
योजना चा उद्देश | कामगारांना प्रत्येक वर्षी 15 हजार रुपये पर्यंतचे नक्की वैयक्तिक लाभ मिळवून देणे. |
कधी सुरु झाली | ९ डिसेंबर २०२० रोजी |
आत्मनिर्भर भारत योजना मराठी PDF
आत्मनिर्भर भारत योजना मराठी PDF
9 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी मिळाली,
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला 22 हजार कोटींची आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेची वैशिष्ट्ये
- भारत सरकार १ आक्टोबर 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत कार्यरत असणाऱ्या नव्या कामगारांसाठी दोन वर्ष अनुदान देणार आहे
- एक हजार कामगार काम करीत आहेत अशा आस्थापनांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांच्या कामगार भविष्य निर्वाह निधीसाठी चे १२% कामगाराचे योगदान आणि 12 % मालकाचे योगदान दोन वर्षे कालावधीसाठी भारत सरकार देणार आहे.
- एक हजारांपेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या आस्थापनांमध्ये कार्यरत नवीन कामगारांच्या कामगार भविष्य निर्वाह निधी साठीची फक्त मालकाचे १२ % योगदान सरकार देणार आहे.
- 15000 पेक्षा कमी मासिक वेतन घेणारे आणि १ ऑक्टोबर 2020 पूर्वी कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही आस्थापनेत काम करणाऱ्या तसेच १ ऑक्टोबर 2020 पूर्वी सार्वत्रिक खाते क्रमांक किंवा ईपीएफओ सदस्य क्रमांक नसणाऱ्या कामगारासाठी सुद्धा योजना लागू होईल.
- कोणत्याही ईपीएफओ सदस्याकडे सार्वत्रिक खाते क्रमांक असेल आणि त्यांचे मासिक वेतन 15000 पेक्षा जास्त नसेल तसेच तो 1/3/2020 ते 30/9 /2020 या कालावधीत नोकरी सोडून गेला असेल आणि 30/9/ 2020 पूर्वी ईपीएफ योजना असलेल्या आस्थापनेत पुन्हा नोकरीवर लागला नसेल तर असा कामगार देखील या योजनेसाठी पात्र ठरेल.
- या योजनेच्या कार्यपद्धती साठी ईपीएफओ एक नवीन सॉफ्टवेअर विकसित करेल तसेच त्यांच्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रक्रिया विकसित करेल.
- ईपीएफओ पात्र कामगार साठी जे योगदान आधार क्रमांकाशी जोडलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा करेल.
- या नव्या योजनेची जेबीआरवाय अंतर्गत येणाऱ्या इतर योजना किंवा ईपीएफओ च्या कोणत्याही योजना यांचे अतिरिक्त लाभ घेतले जाणार नाहीत ते सुनिश्चित करण्यासाठी ईपीएफ नवीन पद्धत विकसित करेल.
आत्मनिर्भर भारत अभियान पोर्टल वर रजिस्टर करण्याची प्रक्रिया
अधिकारीक वेबसाईट – Click Here
- सगळ्यात अगोदर आत्मनिर्भर भारत अभियान च्या आधिकारिक वेबसाइट वर जावे लागेल.
- आता होम पेज वर रजिस्टर वर क्लिक करावे लागेल.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आपले नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादी विचारलेल्या माहिती प्रविष्ट कराव्या लागतील.
- यानंतर, आपल्याला नवीन खाते तयार करण्यासाठी दुव्यावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे आपण सेल्फ-रिलायंट इंडिया कॅम्पेनच्या पोर्टलवर आपली नोंदणी करू शकाल.