अन्नसुरक्षा योजना 2021 | या योजनेतील लाभार्थी कोण आहेत ?
योजनेचे नाव | अन्नसुरक्षा योजना 2021 |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने सुरु केली |
योजना चा उद्देश | अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ मोफत . हा मुख्य उद्देश आहे. |
कधी सुरु झाली | 2013 साली |
- लॉकडाऊनचे निर्बंध जाहीर करताना मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला त्याचा फटका बसू नये यासाठी 5400 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं.
- त्यामध्ये रिक्षा चालकांना, नोंदणीकृत फेरीवाले तसंच इतर मजूर वर्गाला प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे मदत करण्यात येणार आहे.
- त्याशिवाय, अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी केली.
अन्नसुरक्षा योजना म्हणजे काय?
केंद्र शासनाने 2013 साली राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला करून या योजनेची सुरुवात केली . देशातील जवळपास 81 कोटी जनतेला या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळतं.
महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात आली. सद्यस्थितीत 11.23 कोटी जनतेपैकी सात कोटी जनतेला या योजनेअंर्तगत हक्काचं धान्य मिळतं.
अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांना 2002 च्या सुधारीत नियमाप्रमाणे दरमहा 35 किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्याना दरमहा प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं. शहरी भागात 59 हजार रुपये, तर ग्रामीण भागात 44 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना प्राधान्य गटात या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ एका महिन्यासाठी मोफत मिळेल.
अन्न सुरक्षा कायद्याची वैशिष्टये –
- प्रत्येक पात्र व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो धान्य (तांदूळ 3 रुपये, गहू 2 रुपये किंवा प्रमुख तृणधान्य 1 रुपया)
- गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना 6000 रुपये प्रसूतीलाभ.
- गर्भवती महिला आणि 14 वर्षांखालील मुलामुलींना पोषक आहार, कुपोषित मुलामुलींसाठी उच्च पोषणमूल्य असलेला आहार.
- अन्नाचा अधिकार – दोन तृतीयांश लोकसंख्येला अत्यंत सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळण्याचा कायदेशीर हक्क.
- गरिबातल्या गरीब व्यक्तीसाठी करण्यात आलेली 35 किलो धान्याची तरतूद.
अशाच नवीन – नवीन सरकारी योजनासाठी आमच्या Telegram ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा